नांदेड(प्रतिनिधी)-दि.24 मार्च रोजी नांदेड ग्रामीण पोलीसांनी अवैध वाळू वाहतुक करणाऱ्या दोन हायवा गाड्या पकडल्या आहेत. यातील वाळू आणि हायवांची किंमत असा एकूण 30 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर यांना दि.24 मार्च रोजी प्राप्त झालेल्या माहितीनुसार त्यांच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विष्णुपूरी आणि कौठा या भागातून अवैध वाळू वाहतुक होत आहे. त्यांनी आपले सहकारी पोलीस उपनिरिक्षक बाबुराव चव्हाण, पोलीस अंमलदार मोरे, सिरमलवार, भिसे आणि कलंदर यांना तिकडे पाठवले.
विष्णुपूरी येथे या पोलीस पथकाने एम.एच.26 बी.ई. 1837 आणि कौठा येथे एम.एच.17 बी.वाय. 8747 या दोन हायवा गाड्यांना थांबवले. त्यामध्ये 5-5 ब्रास वाळू भरलेली होती. या वाळूच्या संदर्भाने कोणतेही कागदपत्र कायदेशीर दृष्टीकोणातून तयार नव्हते. तेंव्हा पोलीस उपनिरिक्षक बाबूराव चव्हाण आणि पोलीस अंमलदार रामकिशन मोरे यांच्या तक्रारीवरुन गुन्हा क्रमांक 191 आणि 192 दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार मोरे आणि माने हे करीत आहेत. या घटेमधील दोन टिप्पर आणि त्यातील वाळू असा एकूण 30 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल नांदेड ग्रामीण पोलीसांनी जप्त केला आहे.
Post Views: 283
Leave a Reply