नांदेड(प्रतिनिधी)-रविवार ते मंगळवार या तिन दिवसांमध्ये दोन ठिकाणी एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला आहे. याबद्दल काय कायदेशीर कार्यवाही झाली हे वृत्तलिहिपर्यंत तरी कळले नव्हते.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार रविवारी रात्री विष्णुपूरी भागातील एक एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला. बॅंकेच्या सुदैवाने ते एटीएम पुर्णपणे फोडले गेले नाही आणि त्यातील रक्कम वाचली. असाच एक प्रयत्न मंगळवारी रात्री सांगवी परिसरात घडला. या एटीएमला सुध्दा फोडण्यात चोरट्यांना यश आले नाही. त्यामुळे त्याही एटीएममधील रक्कम शिल्लक राहिली.
एटीएम चोरण्याचे प्रयत्न झाले म्हणजे ते काही गम्मत करायला आले नव्हते. आजपर्यंत एटीएम फोडण्याच्या प्रयत्नांमध्ये ज्या चोरट्यांची नावे समोर आली आहेत. ते बहुतांश चोरटे दुसऱ्या राज्यातील आहेत. मग दुसऱ्या राज्यातील लोक आपल्या शहरात वावरत आहेत. याकडे यंत्रणांचे लक्ष नाही काय? कारण तीन दिवसात दोन प्रयत्न झाले आहेत. ती चोरी करणारी मंडळी याच भागात राहिली असेल. सर्वसामान्य माणसाला कायद्याचा धाक पण चोरी करणाऱ्यांवर यंत्रणांचे लक्ष नाही हे दुर्देवच.
Leave a Reply