Advertisement

मोदी-संजय जोशी भेटीमुळे राजकीय समीकरणे बदलणार – VastavNEWSLive.com


या भेटीत एक तिसरी व्यक्ती देखील उपस्थित असेल, जी मोदींच्या दृष्टीने कट्टर शत्रू मानली जाते. काहीजण सांगतात की, 2005 साली घडलेल्या एका घटनेमुळे मोदी त्या व्यक्तीला आपला शत्रू समजतात. या भेटीत त्यांच्या संबंधांवर काय परिणाम होतो, याकडे साऱ्यांचे लक्ष असेल.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 2047 पर्यंत भारतात भारतीय जनता पक्षाचे सरकार हवे आहे. त्यामुळे या बैठकीतील चर्चा आणि त्याचे परिणाम महत्त्वाचे ठरणार आहेत. गुढीपाडव्याच्या दिवशी नागपूरच्या संघ कार्यालयात नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असून, त्याच वेळी संघाचे जय जोशी यांनाही बोलावण्यात आले आहे. 2005 मध्ये झालेल्या गैरसमजुती दूर करण्यासाठी हा प्रयत्न असल्याचे म्हटले जात आहे.

1978 मध्ये नरेंद्र मोदी आणि संजय जोशी यांची अतूट मैत्री होती. ते दोघे एकाच ताटात जेवत होते. पुढे नरेंद्र मोदी गुजरात भाजपचे महासचिव झाले, तर नागपूरचे संजय जोशी गुजरातच्या सचिव पदावर कार्यरत होते. त्यांच्या मेहनतीमुळे भारतीय जनता पक्षाला सत्ता मिळाली. मात्र, गुजरातमध्ये केशुभाई पटेल यांना मुख्यमंत्री करण्यात आले आणि नरेंद्र मोदींना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचा दावा केला जातो. कोणी तरी नरेंद्र मोदींना समजावले की, या घडामोडींसाठी संजय जोशी जबाबदार आहेत. त्यानंतर दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला, जो आजही कायम असल्याचे सांगितले जाते.

महाभारतातील पांडवांचा वनवास 13 वर्षां नंतर संपला, रामायणातील वनवास 14 वर्षांनी संपला, पण संजय जोशींचा ‘वनवास’ अद्याप संपलेला नाही. 2012 मध्ये नितीन गडकरी यांनी त्यांना पक्षाच्या कार्यकारिणीत आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, नरेंद्र मोदी यांनी विरोध दर्शवला होता.

संजय जोशी यांच्या कार्यकाळात भाजपने हिमाचल प्रदेश, राजस्थानसारखी अनेक राज्ये जिंकली होती, आणि पक्षाचा आलेख चढत गेला. मात्र, 2024 मध्ये काही पत्रकारांनी नरेंद्र मोदींना विश्वास दिला की, भाजप 350 जागांवर विजय मिळवेल. या स्वप्नाच्या प्रभावामुळे मोदींनी काँग्रेसला संपूर्णपणे संपवण्याचा प्रयत्न केला. मोठमोठ्या नेत्यांना तुरुंगात टाकण्यात आलं, आणि त्यांच्या अति आत्मविश्वासाला उधाण आलं.

परंतु, पुढील राजकीय घडामोडींमुळे हा अति आत्मविश्वास त्यांच्या अडचणीचाच कारणीभूत ठरला. आता 30 मार्च रोजी नागपूरमध्ये होणाऱ्या बैठकीत हे सर्व मुद्दे चर्चिले जातील का? मोदी आणि संजय जोशी यांच्यातील मतभेद दूर होतील का? संघाच्या 2047 च्या स्वप्नाला चालना मिळेल का? या सर्व प्रश्नांची उत्तरे 30 मार्च रोजी मिळतील.**



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
Join NandedLive
Hello
Can we help you?