Advertisement

अंतिम टप्प्यातील आयआयबी फास्ट 2.0 साठी सर्व शाखांना उत्स्फूर्त प्रतिसाद… !

११ वी नीट, जेईई व सीईटी साठी पहिली बॅच् ७ एप्रिल पासून: सकारात्मक पालकत्व हि काळजी गरज टीम आयआयबी कडून पालकांना मार्गदर्शन

नांदेड – प्रतिनिधी महाराष्ट्राच्या कोचिंग क्षेत्रात सर्वप्रथम शिष्यवृत्तीची मूहूर्तमेढ रोवणारा तसेच आतापर्यंत हजारो होतकरू, गुणवंत आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल विद्याथ्यांच्या जीवनातील आधारस्तंभ ठरलेल्या महाराष्ट्राचा महाब्रॅण्ड आयआयबी ने दहावीतून अकरावीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी व पालकांच्या खास आग्रहास्तव आयआयबी फास्ट परिक्षेचे आयोजन दि.रविवार २३ मार्च केले होते या परीक्षेला आयआयबीच्या राज्यातील सर्वच शाखांकरीता विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून ११ वी २०२५ करिता पहिली बॅच् ७ एप्रिल पाहून सुरु होणार असल्याचे आयआयबी व्यवस्थापनाने जाहीर केले आहे.

फास्ट परिक्षा वैशिष्यै ः

या परीक्षेतून विद्यार्थ्याना खालील सुविधा मिळतील.

· १००% पर्यंत स्कॉलरशिप मिळविण्याची सुवर्णसंधी ,

· आयआयबी फास्ट परीक्षेतील गुणांच्या आधारे ५० विद्यार्थ्यांची एम्स् आयआयटी सुपर ३० बॅच,

· १०० विद्यार्थ्यांची संकल्प बॅच, मर्यादित विद्यार्थी संख्येची मिनी संकल्प बँच.

· इतर बँचेसही आयआयबी फास्ट परीक्षेच्या गुणांच्या आधारे निवडल्या जातील.

· वरील सर्व बॅचेससाठी दरमहा होणाऱ्या जंबो परीक्षेतील गुणांच्या आधारे पुन्हा निवड केली जाते.

आयआयबी इन्स्टिट्यूट नीट-२०२४ ः अद्वितीय यश

नीट – २०२४ च्या निकालात आयआयबीच्या राख सिद्धांत महादेव ७१०, येसणे ओम सुधीर ७००, गायकवाड रुषिकेश नामदेव ७००, भगत प्राजक्ता हिरामण ७००, सय्यद अब्दुल रहमान इरफान अली ६९७, क्षीरसागर अथर्व अनिल ६९६, पाटील रिया ललित ६९६, मिरजे सानिया बापुसो ६९५, सत्वधर महेश प्रसादराव ६९५, जोशी हर्ष संजयकुमार ६९५, पिंगळे अर्चित मनीष ६९१, बोलशेट्टे प्रतीक्षा रविकुमार ६९०, इंगोले अनुष्का गोविंद ६९०, निमगडे अहर्त सिद्धार्थ ६९० एकूण १४ विद्यार्थ्यांनी ७२० पैकी ६९० पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. केमिस्ट्री विषयात ११ विद्यार्थ्यांना १८० पैकी १८०, बायोलॉजी विषयात १० विद्यार्थ्यांना ३६० पैकी ३६०, फिजिक्स विषयात एक विद्यार्थी १८० पैकी १८०. याशिवाय अनेक विद्यार्थ्यांनी नीट-२०२३ मध्ये घवघवीत यश संपादन करत एमबीबीएस शिक्षणाकडे एक पाऊल पुढे टाकले आहे.

जेईई मेन्समध्ये आयआयबीचे विद्यार्थी ठरले चॅम्पियन!

आयआयबी करिअर इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेडच्या विद्यार्थ्यांनी यावर्षी झालेल्या जेईई मेन्स 2025 परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. संस्थेच्या विद्यार्थ्यांनी उच्च गुण मिळवत राष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.

टीम आयआयबी च्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी सातत्याने मेहनत घेत आहेत. संस्थेच्या अनुभवी प्राध्यापकांनी दिलेल्या दर्जेदार मार्गदर्शनामुळे आणि उत्कृष्ट अध्ययन पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना हे यश मिळवता आले आहे. आयआयबीच्या अनेक विद्यार्थ्यांनी 95 पेक्षा अधिक पर्सेंटाइल मिळवत उज्ज्वल यश संपादन केले आहे.

सकारात्मक पालकत्व हि काळजी गरज : टीम आयआयबी कडून पालकांना मार्गदर्शन

दरम्यान यावेळी उपस्थित पालकांना टीम कडून मार्गदर्शन करण्यात आले. यात त्यांना नीट, जेईई व सीईटी वद्दल तसेच आयआयबी प्रवेश प्रक्रिया, आयआयबी बॅचेस संरचना, आयआयबी सिस्टीम बद्दल मार्गदर्शन करण्यात आले. तसेच पालकांना विद्यार्थ्यांच्या विकासात भर घालण्यासाठी करावायचे सकारत्मक पालकत्व आणि पाल्यांच्या आवडीनुसार करिअर करू द्यावे असेही सांगण्यात आले. पाल्यांवर कोणतेही दडपण न आणता त्यांना करिअर विषयी मार्गदर्शनही टीम आयआयबी कडून करण्यात आले.

पालकांकडून टीम आयआयबी चे अभिनंदन व कौतुक, उपस्थित पालकांनी आयआयबी च्या व्यवस्थापनाबरोबर आयआयबी ची सुरक्षा, टीचिंग टीम याचे कौतुक केले. आयआयबी मध्ये फक्त शिक्षण नाहीतर विद्यार्थ्यांच्या मुलभूत विकास आणि संस्कार यावर भर दिला जातो असे यावेळी उपस्थित पालकांनी प्रतिक्रिया देताना सांगितले. सर्वाना समान न्याय, प्रत्येकाला पुढे जाण्याची वारंवार मिळणारी संधी यामुळेच आयआयबी ला सर्वधिक पसंती दिल्याचेही पालकांनी माध्यमांना यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
Join NandedLive
Hello
Can we help you?