नांदेड(प्रतिनिधी)-एका 38 वर्षीय महिलेने पैसे देण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणानंतर काही तरी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. या प्रकरणी तामसा पोलीसांनी चार जणंाविरुध्द आत्महत्येस प्रवृत्त केले. या सदराखाली गुन्हा दाखल केला.
अविनाश सिन्नप्पा पवार (19) रा.घोगरी ता.हदगाव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 21 मार्च रोजी त्यांची आई शांताबाई सिनप्पा पवार (38) यांनी काही तरी विषारी औषध प्राशन करून आपल्या राहत्या घरात आत्महत्या केली आहे. याची कारण सांगतांना अविनाश पवारने आपल्या तक्रारीत लिहिले आहे की, सिन्नप्पा पवार, संगिता पवार, सुनकाबाई चौगुले आणि लक्ष्मण पवार या चौघांनी संगनमत करून पैसे देण्याच्या कारणावरून भांडण केले होते. या भांडणामुळे शांताबाई पवारला मानसिक ताण आला आणि त्यामुळेच त्यांनी आत्महत्या केली आहे. तामसा पोलीसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम 108, 3(5) नुसार गुन्हा क्रमांक 55/2025 चार जणांविरुध्द दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक खेडकर करीत आहेत.
Post Views: 175
Leave a Reply