नांदेड(प्रतिनिधी)-दोन युवकांनी जुन्या भांडणाच्या कारणातून एका 20 वर्षीय युवतीचा खून केल्याचा प्रकार लोहा गावातील कानोडे कॉम्प्लेक्स येथे घडला आहे.
संगिता रमेश तेलंग यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 21 मार्च रोजी सकाळी 9.45 ते सायंकाळी 6 वाजेदरम्यान कानोडे कॉम्प्लेक्समधील त्यांच्या घरी धनश्री रमेश तेलंग (20) गऊळ ता.कंधार हिला आरोपी निखील सुरेश भालेराव रा.पेठशिवणी ता.पालम आणि राम वानखेडे रा.बेटसांगवी ता.लोहा या दोघांनी संगणमत करून संगिता तेलंग घरी नसतांना त्यांच्या घरी जाऊन जुन्या भांडण्याच्या कारणावरून धनश्री रमेश तेलंगला डोक्यात कोणत्या तरी वस्तुने मारुन आणि तिचा गळाआवळून खून केला असा संशय आहे. लोहा पोलीसांनी या तक्रारीनुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम 333, 103(1), 351(3) आणि 3 (5) नुसार गुन्हा क्रमांक 83/2025 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास लोहाचे पोलीस निरिक्षक नागनाथ आयलाने हे करीत आहेत.
Leave a Reply