नांदेडव श्री क्षत्रिय समाज (रजि. एफ-११) राजपूत नांदेड आणि यादव अहीर मंडळ तर्फे आयोजित भव्य होळी मिलन सोहळा राधाकृष्ण मंदिर परिसरात अत्यंत उत्साहात आणि आनंदात संपन्न झाला. या सोहळ्यात राम प्रताप भजन मंडळाने राजपूत समाज बांधवांचे पारंपरिक होळीच्या फागाने आणि भक्तिमय गीतांनी भव्य स्वागत केले. भजनाच्या सुरावटींनी वातावरण भक्तिमय झाले आणि उपस्थितांनी रंगांची उधळण करून होळीच्या रंगात रंगून गेले.
या कार्यक्रमात यादव अहीर मंडळाच्या सदस्यांनी विशेष सहभाग नोंदवत राजपूत समाज बांधवांचा सन्मान केला आणि त्यांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. यादव अहीर मंडळाने पुष्पवर्षावाने राजपूत समाजाचे स्वागत केले. या प्रसंगी दोन्ही समाजातील बांधवांनी एकत्र येऊन बंधुभाव आणि एकतेचे दर्शन घडवले.
समारंभात राजपूत समाजाच्या सदस्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून होळीचे फाग गात नृत्य केले. ढोल-ताशांच्या गजरात आणि रंगांच्या वर्षावात संपूर्ण परिसर आनंदमय झाला. बाल गोपाल ही मोठ्या संख्येने सहभाग घेत विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि पारंपरिक नृत्य सादर केले.
श्री क्षत्रिय समाज (रजि. एफ-११) राजपूत नांदेडचे अध्यक्ष यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “होळीचा सण हा आपल्याला एकतेचा संदेश देतो. या सणाद्वारे समाजात प्रेम आणि सौहार्दाची भावना अधिक दृढ होते. आजच्या या सोहळ्यात विविध समाजातील बांधवांनी एकत्र येऊन जी एकता आणि बंधुत्व दाखवले ते कौतुकास्पद आहे.”
या सोहळ्याला भारत भूषण यादव, गगन यादव, तुलजाराम पैलवान, राजू बटाऊवाले,गणेशलाल मंडले, गोपाल फतेहलष्करी,मनोज मंडले ईश्वर बटाऊवाले डॉ. कैलाश यादव
गोकुल यादव, शुभम यादव, भावेश यादव, तथा नांदेडमधील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती, समाजातील मान्यवर आणि युवा वर्गाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. सोहळ्यानंतर उपस्थितांसाठी पारंपरिक मिठाई आणि अल्पोपाहाराची व्यवस्था करण्यात आली होती.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री यादव युवक संघ, यादव अहीर मंडळ च्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध आणि उत्साहात पार पडला. होळी मिलन सोहळ्याने राजपूत व यादव समाजातील एकता आणि सांस्कृतिक वारसा पुन्हा एकदा अधोरेखित केला.
Post Views: 51
Leave a Reply