नांदेड- शहराजवळच्या पुयनी येथे आंबे तोडल्याने एका निवासी शाळेतील वार्डनने तीन शाळकरी मुलांना जबर मारहाण केली. या प्रकरणी लिंबगाव पोलीस ठाण्यात गून्हा दाखल करण्यात आला आहे.
पुयनी गावाजवळ जिज्ञासा नावाची निवासी शाळा आहे. या शाळेत गावातील मुल देखील शिकायला आहेत. शाळेतील दोन मुलं आणि गावातील त्यांचा एक मित्र असे तिघे जण आज सायंकाळी शाळेच्या परिसरात आले. झाडावरील आंबे तोडताना त्यांना वार्डन परमेश्वर संकेवाद याने पाहिले. या तिन्ही मुलाना त्याने प्लास्टिकच्या पाईपने जबर मारहाण केली. मुलाच्या हाथावर , पायांवर , मांडीवर त्यानें मारहाण केली . मारहाणीचे व्रण देखील या लहान मुलाच्या अंगावर उमटले . दरम्यान ही घटना समजल्यानंतर पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पालकांच्या तक्रारीवरुन लिंबगाव पोलीसांनी वार्डन परमेश्वर संकेवाड याच्या विरोधात गुन्हा दाखल केला .
Leave a Reply