भारतातील संपुर्ण इंटरनेट आता अमेरिकेचे राष्ट्रपती डोनॉल्ड ट्रम्प यांच्या अत्यंत जवळचे असलेल्या एलॉन मस्क यांच्या हातात जाणार आहे. त्यावर आपल्यावतीने केंद्रीय दुरसंचार मंत्री तथा रेल्वे मंत्री अश्र्विनी वैष्णव यांनी अभिनंदनाची पोस्ट करून ती काही तासात डिलिट केली. यावरून पडद्या मागे काही रहस्य आहे काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. एलॉन मस्कची कंपनी स्टारलिंक भारताचा सर्व इंटरनेट आपल्या हातात घेईल तर तो भारताच्या सुरक्षेला सुध्दा मोठा धोका राहिल. कारण एलॉन मस्कच्या कंपनीचा पॅटागॉन (अमेरिकेचे सुरक्षा मुख्यालय) यांच्यासोबत डाटा शेअर करण्याचा करार झालेला आहे.
भारतात एअरटेलने स्टारलिंक सोबत करार केला. 48 तासातच भारताची जीओ कंपनी सुध्दा स्टारलिंकसोबत जोडली गेली. भारतातील एनडीटीव्ही ही वृत्तवाहिनी गौतम आडणी यांची आहे. त्यांनी अश्र्विनी वैष्णव यांनी केलेल्या पोस्टबद्दलचा उल्लेख केला.परंतू न्युज 18 यांनी केला नाही. कारण ही वृत्तवाहिनी मुकेश अंबानी यांच्या मालकीची आहे. यावरून आपसात ट्रेड वार सुरू झाला काय? याची शंका येते. खरे तर स्टारलिंक सोबत झालेला हा करार भारतासाठी उत्कृष्ट म्हणावा लागेल. कारण ज्या ठिकाणी आज आम्ही नेटवर्क नाही यासाठी त्रासतो, ज्या ठिकाणी नैसर्गिक आपत्ती होते त्या ठिकाणी नेटवर्क खराब होते. भारतातील दुर्गम भागात नेटवर्क या करारामुळे उपलब्ध होईल. कारण स्टारलिंक उपगृहाच्या माध्यमातून भारताला इंटरनेट पुरवणार आहे. हा इंटरनेट रेल्वेसाठी सुध्दा उपयोगी होईल. पृथ्वीच्या कक्षेत अत्यंत खालच्या स्थरावर सात हजार उपगृहांची मालिका स्टारलिंककडे आहे म्हणून आजच्या परिस्थितीत त्यांचे नेटवर्क सर्वात मोठे आहे. स्टारलिंक जगातील 100 देशांना उपगृहाच्या माध्यमातून इंटरनेट सेवा पुरवते. पुढे या इंटरनेट सेवेचा उपयोग शिक्षण संस्था, व्यापार, डिजिटल आरोग्य सेवा यांच्यासाठी सुध्दा उपयोगी होईल.
राजकीय लोक ज्याला आज खलनायक म्हणतात. तोच खलनायक उद्या त्या राजकीय लोकांसाठी नायक होतो. याचे उदाहरण समजून घ्यायचे असेल तर अडाणीविरुध्द अमेरिकेने वॉरंट जारी केले तेंव्हा केंद्रीय मंत्री निशिकांत दुबे यांनी अमेरिकेच्या मदतीने विरोधी पक्ष नेते खा.राहुल गांधी भारताला कमजोर करण्यासाठी खेळी करत आहेत. ओसीसीआरपीचे नाव घेवून खा.संदीप पात्रा यांनी खा.राहुल गांधींना देशद्रोही म्हणले होते. त्यावेळी अमेरिका ही खलनायक झाली होती. आणि आता एलॉन मस्कच्या स्टारलिंकसोबत करार करून भारतभराचा इंटरनेट कारभार अमेरिकेच्या हातात दिला जात आहे. भविष्यात हा कारभार भारतीय सुरक्षेला सुध्दा धोका होण्यासारखा आहे. स्टारलिंकच्या इंटरनेट माध्यमाने ऑनलाईन गेम, स्ट्रीमिंग याच्यासाठी सुध्दा मोठा उपयोग होणार आहे. हे इंटरनेट वापरतांना कंपनी ग्राहकांना एक किट देईल. त्यात राऊंडर, पावर सप्लाई, केबल आणि मॉऊटिंग ट्रॉयपॉड असेल. उच्च दर्जाची आणि अतिजलद गती मिळावी म्हणून या किटची छत्री आकाशाकडे तोंड करून ठेवली जाणार आहे. त्यासाठी ऍनरॉईडवर स्टारलिंक ऍप आहे. त्याद्वारे सेटऍप आणि मॉनिटरींग होणार आहे.
उपगृहासोबत जोडले जाणे हा भारताच्या सुरक्षेसाठी मोठा धोका होवू शकतो. भारतीय जनता पार्टी देशभक्ती, राष्ट्रसुरक्षा या शब्दांवर इतरावर युएपीए कायद्यानुसार कार्यवाही करून त्यांना तुरूंगात टाकते. पण आज स्टारलिंक बाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देणे त्यांना बंधनकारक नाही. भारता-पाकिस्तानच्या सिमेतील एक किलो मिटरवर अडाणीने गुजरातमध्ये खाबडा येथे दुरसंचारचा करार केला. त्यावर भारतीय सेनेने आक्षेप पण घेतला. हा करार करतांना सुरक्षा मानके कमी केली काय? याचे उत्तर शासन देत नाही. मार्च 2024 मध्ये भारतात ग्रामीण टेलिडेन्सीटी 59.1 टक्के आहे. म्हणजे स्टारलिंक सोबतचा हा इंटरनेट करार गेमचेंजर ठरेल. परंतू अगोदर वेलकम टु इंडिया आणि त्यानंतर डिलिट या मागे काय रहस्य आहे. याचा शोध होत नाही. एलॉन मस्कची आज प्रशंसा करत आहेत. त्यामुळे संगोल युग येणार आहे काय? यालाच अमृतकाळ म्हणायचे काय, हीच भारतीय जनता पार्टीची लोकशाही आहे काय? या कोणत्याही प्रश्नामध्ये सरकार पारदर्शक नाही. स्टारलिंकचा पेंटागॉन सोबतचा करार म्हणजे ज्या 100 देशांमध्ये स्टारलिंकचे इंटरनेट आहे. त्या सर्व देशांचा डाटा स्टारलिंककडे उपलब्ध होईल आणि तो डाटा पेंटागॉन कधीहीपण घेवू शकेल. इतर 100 देशांचे जळूद्या हो. भारताच्या इंटरनेट डाटा संदर्भाने जी सुरक्षा हवी ती कोठे आहे. याचा प्रश्नाचे उत्तर वाचकांनी शोधायचे आहे.
Post Views: 54
Leave a Reply