नांदेड(प्रतिनिधी)-गोरठा येथे जाळून खून केलेल्या अनोळखी मयताची ओळख पटली. सोबतच त्यांचे मारेकरी सुध्दा उमरी पोलीसांनी शोधून काढले आहेत. या कामगिरीमध्ये स्थानिक गुन्हा शाखेचा सुध्दा सहभाग आहे.
दि.12 मार्च रोजी मौजे गोरठा शिवारात उमरी ते मुदखेड जाणाऱ्या रस्त्यावर एक 25 ते 30 वयोगटातील व्यक्तीला प्लॉस्टिकच्या टाकीमध्ये टाकून जाळून टाकल्याच्या परिस्थिती प्रेत सापडले होते. या संदर्भाने सुरूवातीला आकस्मात मृत्यू दाखल करण्यात आला होता. उमरी पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा यांनी मिळून या प्रकरणाचा शोध घेतांना परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचे निरिक्षण करून शोध लावण्यात आला. मरणारा माणुस हा साईनाथ विठ्ठल शिंदे (24) धंदा चालक असल्याचे कळले. यानंतर मयत साईनाथ शिंदेचे वडील विठ्ठल माणिकराव शिंदे रा.क्र्रांतीनगर असर्जन यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सुनितााकौर रामसिंग बगेल या महिलेसोबत मरणारा साईनाथ विठ्ठल शिंदेचे अनैतिक संबंध होते. महिला लग्नाचा तगादा लावत होती. पण साईनाथ लग्न करत नव्हता म्हणून सुनिताकौर रामसिंग बगेल (38) आणि तिचा मुलगा जितु रामसिंग बगेल या दोघांनी साईनाथ शिंदेचा खून केला आहे. या तक्रारीनुसार उमरी पोलीसांनी दोघांविरुध्द गुन्हा क्रमांक 79/2025 दाखल केला आहे. या दोन्ही मारेकऱ्यांना उमरी पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरिक्षक आरमाळ यांच्याकडे देण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हा शाखेचे कर्तव्यदक्ष पोलीस निरिक्षक उदय खंडेराय, उमरीचे सहाय्यक पोलीस निरिक्षक अंकुश माने, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस उपनिरिक्षक आनंद बिचेवार, पोलीस अंमलदार गंगाधर कदम, रुपेश दासरवाड, संजीव जिंकलवाड, शितल सोळंके, शेख महेजबीन, राजकुमार डोंगरे, महेश बडगु, राजू सिटीकर आणि दिपक ओढणे यांनी हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी मेहनत घेतली.
Leave a Reply