नांदेड(प्रतिनिधी)-मुदखेड पोलीसांनी तीन चोरट्यांना पकडून त्यांच्याकडून चोरी केलेल्या सहा दुचाकी गाड्या जप्त केल्या आहेत.
दि.11 मार्च रोजी महम्मद फेरोज महम्मद सलीम यांची दुचाकी गाडी नवी अबादी मुदखेड येथून चोरीला गेली होती. त्यासंदर्भाने मुदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 41/2025 दाखल होता. या संदर्भाचा तपास करतांना पोलीस उपअधिक्षक डॅनियल जॉनबेन यांच्या मार्गदर्शनात मुदखेडचे पोलीस निरिक्षक वसंत सप्रे, पोलीस उपनिरिक्षक शिवाजी शिंदे, पोलीस अंमलदार चंद्रशेखर मुंडे, बलविंदरसिंह ठाकूर यांनी बिनताळ ता.उमरी येथे निरंजन सायन्ना भुसलवाड(21), योगेश गंगाधर नागदरवाड आणि अजय साहेबराव भुसलवाड या तिघांना पकडले. त्यांच्याकडून पोलीस ठाणे उमरीच्या हद्दीतून चोरी गेलेली दुचाकी क्रमांक एम.एच.26 बी.वाय.6548, पोलीस ठाणे मुखेड हद्दीतून चोरीला गेलेली दुचाकी क्रमांक एम.एच.22 ए.वाय0751, ईस्लापूर हद्दीतून चोरीला गेलेल्या दोन दुचाकी क्रमांक एम.एच.26 सी.आर.4658 आणि एम.एच.26 सी.जे.5008 आणि हदगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेलेली दुचाकी क्रमांक एम.एच.20 एफ.एच.5070 अशा पाच दुचाकी पकडल्या. त्यांची किंमत 2 लाख 60 हजार रुपये आहे.
Post Views: 206
Leave a Reply