नांदेड(प्रतिनिधी)-अवैध वाळू वाहतुक करणारा एक टिपर पकडून अर्धापूर पोलीसांनी दोन जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. 10 हजारांची वाळू आणि 5 लाखांचा टिपर असा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अंमलदार सलिम शाह कलीम शाह यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.13 मार्च रोजी रात्री 10 वाजेच्यासुमारास अर्धापूर जवळच्या मारोती सुझुकी शोरुम जवळ त्यांनी टिपर क्रमंाक एम.एच.48 जे.0885 ची तपासणी केली. त्यामध्ये अवैध वाळू भरलेली होती. अर्धापूर पोलीसांनी दत्ता लक्ष्मण कोमटवार (27) टिपर चालक आणि पांडूरंग दशरथ कल्याणकर रा.पिंपळगाव मक्ता ता.अर्धापूर जि.नांदेड या दोघांविरुध्द गुन्हा क्रमांक 154/2025 दाखल केला आहे. ही कार्यवाही पोलीस उपअधिक्षक डॅनियल जॉनबेन यांच्या नेतृत्वात पोलीस निरिक्षक चंद्रशेखर कदम, पोलीस उपनिरिक्षक महेश कोरे, पोलीस अंमलदार विजय कदम, अखील शेख आणि सलीम शाह यांनी केली आहे.
Post Views: 219
Leave a Reply