•100 दिवसात 1 लाख 52 हजार घनमीटर गाळ **
• *यावर्षी एकूण 53 प्रकल्पातून 5 लाख 80 हजार 721 घ.मी. गाळ काढण्याचे उद्दिष्ट**
नांदेड – नांदेड जिल्ह्यात सन 2023-24 या वर्षात 13 प्रकल्पातून प्रायोगिक तत्वावर 1 लाख 41 हजार 846 घनमीटर गाळ काढला असून यामुळे प्रकल्पांच्या मुळ साठवण क्षमतेत वाढ झाली आहे. 13 प्रकल्पातून काढण्यात आलेला गाळ अनुदानपात्र 201 शेतकऱ्यांच्या शेतात पसरविण्यात आलेला आहे. यावर्षी 53 तलावातून गाळ काढण्याचे उद्दिष्ट आहे. यासंदर्भातील माहितीसाठी संबंधितानी जिल्हा संधारण अधिकारी, चैतन्यनगर, नांदेड यांचे कार्यालयाशी तसेच दूरध्वनी क्रमांक 02462-260813 वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेची आढावा बैठक नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. यावेळी उपजिल्हाधिकारी रोहयो संजीव भोरे, जिल्हा जलसंधारण अधिकारी एस.एस. कांबळे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी द.रा. कळसाईत, तंत्र अधिकारी के.एम जाधव, कार्यकारी अभियंता पाटबंधारे आ.शी. चौघुले, जिल्हा जलसंधारण अधिकारी जि. प अशोक भोजराज आदींची उपस्थिती होती.
राज्य शासनाने दिलेल्या कृती आराखड्यानुसार 100 दिवसांच्या कार्यक्रमात जिल्ह्यात 1 लाख 52 हजार घनमीटर गाळ काढण्याचे उद्दिष्ट दिले आहे. तसेच गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत सन 2024-25 या वर्षात एकूण 53 प्रकल्पातून 5 लाख 80 हजार 721 घ.मी. गाळ काढण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या प्रकल्पातून गाळ काढण्याचे काम नाम फाऊडेशन, टाटा मोटार्स, भारतीय जैन संघटना तसेच स्थानिक सेवाभावी संस्था यांच्यामार्फत करण्यात येणार आहे.
तसेच मृद व जलसंधारण उपविभागासाठी कार्यालय प्रमुखाचे नाव भ्रमणध्वनी क्रमांक दिले आहेत. जिल्ह्यातील 53 तलाव वगळता इतर तलावातून गाळ काढावयाचा असल्यास पुढील दिलेल्या तालुका निहाय अधिकारी यांच्याशी शेतकऱ्यांनी संपर्क करावा. मृद व जलसंधारण विभागाच्या नांदेड विभागात नांदेड, हदगाव, हिमायतनगर या तालुक्यासाठी आर. वाय. मुरमुरे यांचा मो. क्र. 8007262021 , मुखेड तालुक्यासाठी एच.जी.कानडे यांचा मो. क्र. 9423347886, नायगाव विभागात नायगाव, धर्माबाद, उमरी तालुक्यासाठी बी.एस.मोरे यांचा मो.क्र.9421854513, भोकर विभागात भोकर, मुदखेड, अर्धापूर तालुक्यासाठी डी. डी. गायकवाड यांचा मो. क्र. 9049888753, कंधार विभागात कंधार व लोहा तालुक्यासाठी यु.डी. गायकवाड यांचा मो. क्र. 9049888753, किनवट विभागात किनवट व माहुर तालुक्यासाठी ङिए. गडदे यांचा मो. क्र. 7276167441 आणि देगलूर विभागात देगलूर व बिलोली तालुक्यासाठी टि. ए.मुरुमकर यांचा मो. क्र. 9421321402 संपर्क क्रमांक आहेत.
गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत काम करणाऱ्या अशासकीय संस्थाना यंत्रसामग्री आणि इंधन यांचा खर्च देणे प्रस्तावित आहे. तसेच अल्प व अत्यल्पभुधारक, विधवा, अपंग व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना या योजनेचा पुरेपुर लाभ घेता येईल यासाठी अनुदान देणे प्रस्तावित आहे. अशासकीय संस्थाना गाळ काढण्यासाठी लागणाऱ्या यंत्र सामुग्री आणि इंधन यासाठी 31 रुपये प्रती घनमीटर व पात्र शेतकऱ्यांना शेतात गाळ पसरविण्यासाठी 35.75 प्रती घनमीटर प्रमाणे 15 हजारच्या मर्यादा व 2.5 एकरसाठी 37 हजार 500 रुपयापर्यत अनुदान दिले जाणार आहे.
Post Views: 27
Leave a Reply