Weight Loss | वजन कमी करत असाल तर कधीही करू नका ‘या’ चूका

Read Time:3 Minute, 58 Second

 

 

मुंबई | सध्याच्या धावपळीच्या जीवनात बरेचजण स्वत: च्या आरोग्याकडे (Health) दुर्लक्ष करत असल्याचं दिसुन येतं. अनेकजण स्वत: च्या शरिराबाबत खूप चिंतेत असल्याचंही पहायला मिळतं. या धावपळीच्या जीवनात आपल्या आरोग्याचीही तितकीच काळजी घेतली पाहिजे. अनेक लोकांमध्ये आरोग्यविषयक समस्या आढळून येतात.

भारतात आजपासून म्हणजेच 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर पर्यंत राष्ट्रीय पोषण सप्ताह साजरा केला जाणार आहे. अलीकडे आरोग्यविषयक समस्यांमध्ये लठ्ठपणा आणि वजण वाढणे हे मूळ कारण आढळून येते. ही समस्या दूर करण्यासाठी संतुलित ठेवणे आणि लठ्ठपणा कमी करणे जास्त गरजेचं आहे. वजन कमी करण्यासाठी शारिरीक व्यायामासोबतच संतुलित आहरहाराचेही सेवन करायला हवं.

वजणकमी करायचं असेल तर काही पदार्थांचं सेवन करणं टाळायला हवं. याचा अर्थ असाही नाही की वजण कमी करण्यासाठी उपाशी पोटी रहायचं. यामुळे शारिरिक ताकदीवर परिणाम होऊन अशक्तपणा येऊ शकतो. सोशल मिडीयावर बरेच पदार्थ दाखवले जातात आणि त्याचे शरिराला अनेक फायदे असल्याचे दावेही केले जातात.  परंतु तुम्ही जर आधीपासूनच Healthy Diet Plan फॉलो करत असाल तर सोशल मिडीयावर दाखवल्या जाणाऱ्या पदार्थांचं सेवन करणं टाळा.

वजन कमी करण्यासाठी देखील Healthy Diet Plan करणं गरजेचं आहे. वाढलेलं वजन कमी करण्यासाठी बरेचजण Kito Diet आणि Atkins Diet फॉलो करत असल्याचं दिसत येत. पण असं कोणतंही डाएट फॉलो करण्याआधी त्याबद्दलची पूर्ण माहिती घेणे आवश्यक आहे. जर त्या बद्दल पुरेशी माहिती नसेल तर तो डाएट प्लॅन फॉलो करणं टाळावं. कारण चुकिच्या आहाराचे सेवन केल्याने शरिरिरावर धोकादायक परिणाम होण्याची शक्यता असते.

किटोजेनिक डाएटलाच किटो डाएट म्हटलं जातं. याला लो कार्ब (कर्बोदके) डाएट म्हणजेच झटपट वजन कमी करणारं डाएट असं देखील म्हटलं जातं. किटो डाएटमध्ये कर्बोदकाचं प्रमाण कमी आणि फॅटचे प्रमाण अधिक असतं. तर प्रोटिनचे प्रमाण हे कार्बच्या आणि फॅटच्या प्रमाणाच्या मध्यम असते. एटकिंस आणि किटोजेनिक डाएटमध्ये लोक आहारामध्ये अशा प्रकारच्या पदार्थांचा समावेश करतात. ज्यामध्ये कर्बोदकांचा समावेशच नसतो.

यासोबतच जीएम डाएट हा एक डाएट प्लॅन देखील लोक फॉलो करतात. जीेएम डाएट प्लॅन मध्ये सात दिवसात सात किलो वजन कमी करण्याचा दावा करण्यात येतो. आठवड्याच्या सातही दिवस सात वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचे सेवन केले जाते. या डाएटमध्ये बॉडी डिटॉक्स करणाऱ्या पदार्थांचा समावेश केला जातो. ह्या डाएट प्लॅनच्या मदतीने लवकर वजन कमी करण्यास मदत होते. पण हा परिणाम काही दिवसांसाठीच राहतो. म्हणजेच जर डाएट फॉलो करणं सोडलं तर वजन परत वाढल्याचं लक्षात येत.

Online NEWS source

Leave a Reply

Your email address will not be published.

four × five =