Toyota ची सर्वात जबरदस्त कार लवकर भारतात लाँच होणार!

Read Time:3 Minute, 41 Second


नवी दिल्ली | सध्या चारचाकी गाड्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. यातच टोयोटा किर्लोस्कर (Toyota Kirloskar) लवकरच भारतात आपली नवीन कार लाॅन्च करणार आहे.

Toyota किर्लोस्कर त्यांच्या कंपनीची नवीन एमपीव्ही लाॅन्च करत आहे. Toyota अवांझा (Toyota Avanza) असं नाव कंपनीने या कारला दिलं आहे. यासाठी कंपनीची तयारी सुरु आहे. कंपनीची उत्पादनापासून ते लाॅन्च करण्यापर्यंत वेगाने सुरु आहे.

सध्या एमपीवी (MPV) सेगमेंटची मागणी वाढत आहे. यामुळे या गाडीची लक्षात घेऊन प्रचंड जागा आणि क्षमतामुळे त्या सेगमेंंटची मागणी जास्त होती. ही मागणी लक्षात घेऊन कंपनी एक निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता कंपनी नवीन 7 सीटर कार लॉन्च करणार आहे.

या सेगमेंटमध्ये टोयोटाची इनोव्हा क्रिस्टा (Toyota’s Innova Crysta) आहे. त्यामुळे मारुती एर्टिगाला टक्कर देण्यासाठी ही कार मिड रेंजमध्ये लाॅन्च केली जाईल. या कारची रचना मारुती एर्टिगा सारखीच असणार आहे. ही कार कंपनी MPV मारुती सुझुकीसोबत तयार करणार आहे.

अनेक नवनवीन फीचर्ससह Toyota किर्लोस्कर ही MPV सादर करणार आहे. Toyota अवांझा लाॅन्च करण्याबाबत कंपनीने कोणतीही माहिती शेअर केली नाही. या कारच्या फिचर्सबद्दल (Features) जाणून घेऊया.

या कारमध्ये 1.3 लीटर नॅचरली एस्पिरेटेड इंजिन असणार आहे. या इंजिनमध्ये 98 पाॅवर आणि 121 पीक टार्क जनरेट करण्याची क्षमता आहे. याशिवाय इंजिनसोबत 5 स्पीड मॅन्युअल आणि 6 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मिळणार आहे.

इतर वैशिष्ट्याबद्दल बोलायचं झालं तर यामध्ये मोबाईल कनेक्टिव्हिटीसह 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ऑटो एसी, समोर हवेशीर जागा वायरलेस चार्जर अश्या सुविधा आहेत. मागील बाजूस 12V USB चार्जिंग पॉइंट, मल्टी-फंक्शन स्टीयरिंग (Multi-function steering) फीचर्स आहेत.

सुरक्षितेतेबद्दल पाहायला गेल्यास या कारमध्ये 7 सीटर एमपीव्हीमध्ये 6 एअरबॅग्ज, पुढील आणि मागील बाजूस स्किड प्लेट्स, हिल स्टार्ट असिस्ट आहेत. याचबरोबर ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंग, अँटी लॉक ब्रेकिंग (Anti lock braking) सिस्टम, EBD, अलर्ट यांसारखी वैशिष्ट्य आहेत.

Toyota अवांझा प्रतिस्पर्धी भारतात (India) लॉन्च केल्यानंतर इतर गांड्याशी स्पर्धा सुरु होईल. ही कार कंपनी लवकरचं लाॅन्च करण्याच्य तयारीत आहे.

थोडक्यात बातम्या

नारळाच्या झाडावर एक बिबट्या, खालून दुसरा बिबट्या… लोकांची तंतरली

Urvashi rautela ने शेअर केले हॅाट फोटोज, चाहत्यांच्या एकच उड्या

Leave a Reply

Your email address will not be published.

17 + 2 =