TATA च्या ‘या’ 5 कारवर मिळतोय मोठा डिस्काउंट, जाणून घ्या ऑफर आणि किंमत

Read Time:2 Minute, 51 Second


नवी दिल्ली । टाटा मोटर्सकडून सप्टेंबर महिन्यामध्ये हेरियर, सफारी, टियागो आणि टिगोर या Cars वर बंपर डिस्काऊंट देत आहे. यासोबतच Tata Motors पहिल्यांदाच या महिन्यात Tata Tigor CNG वरही डिस्काऊंट देत आहे. आपण आज टाटा मोटर्स कडून देण्यात येत असणाऱ्या या ऑफर्स आणि डिस्काऊंट बद्दल जाणून घेणार आहोत.

टाटा हेरियर कारवर Exchange ऑफर मध्ये एकूण 40,000 रुपयांची सूट मिळणार आहे. याशिवाय 5,000 रुपयांची कॉर्पोरेट सुट मिळणार आहे. हा डिस्काऊंट Harrier SUV मॉडेलवरही मिळणार आहे. ही SUV दोन लिटर डिझेलच्या इंजिनसह उपलब्ध आहेत.

टाटा सफारीवर एक्सचेंज बोनसमध्ये 40,000 रुपयांचा डिस्काऊंट मिळत आहे. मात्र यावर Tata Motors कडून कोणतंही कॉर्पोरेट डिस्काऊंट दिलं जाणार नाहिये. याचा फायदा हेरियर प्रमाणेच सफारीच्याही सर्व मॉडेल्सला होणार आहे.

टाटा मोटर्सकडून पहिल्यांदाच Tigor CNG या मॉडेलवर ग्राहकांना लाभ देण्यात येत आहे. Tata Tigor CNG 15,000 रुपयांचा कॅश डिस्काऊंट आणि 10,000 रुपयांचा एक्सचेंच बोनस देखील मिळत आहे. Tigor CNG मध्ये 1.2 लिटरचं इंजिन देण्यात आलंय.

टाटा टिगॉरच्या सर्व मॉडेल्सवर 20,000 रुपयांचा डिस्काऊंट मिळत आहे. यामध्ये 10,000 रुपयांची रोख सवलत दिली जाणार आहे. टाटा टिगॉरच्या पेट्रोलच्या मॉडेलमध्ये  CNG मॉडेलप्रमाणेच 1.2 चं इंजिन देण्यात आलं आहे.

टाटा टियागो हॅचबॅकवर 10,000 रुपयांची रोख सवलत आणि 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनसही मिळणार आहे. यावर एकूण सवलत 20,000 रुपयांपर्यंत जाते. काही डीलरशिप हॅचबॅकवर 3,000 रुपयांची अतिरिक्त कॉर्पोरेट सूट देखील देतात. तथापि, टिगोरच्या विपरीत, टियागोच्या सीएनजी प्रकारावर कोणतीही सूट नाही. 

थोडक्यात बातम्या- 

महागाईने त्रस्त सर्वसामान्यांसाठी दिलासा देणारी बातमी!

आदित्य ठाकरेंचं गुलाबराव पाटलांना प्रत्युत्तर, म्हणाले…

Leave a Reply

Your email address will not be published.

sixteen − fifteen =