Share Market | ‘या’ शेअरनं करुन दिली छप्परफाड कमाई; गुंतवणुकदार बनले करोडपती

Read Time:2 Minute, 36 Second


Share Market | कोरोना महामारीचा सर्व क्षेत्रांना फटका बसला. अशातही शेअर बाजार (Share Market) हे एकमेव क्षेत्र आहे ज्यामध्ये सध्या चांगली कामगिरी होत आहे. अनेक व्यवसाय कोरोनाच्या काळात ठप्प होते पण शेअर बाजारात मात्र तेजी कायम होती. परिणामी गुंतवणुकदारांना (Investors) काही शेअर्सच्या माध्यमातून मोठा रिटर्न मिळाला आहे.

एक शेअर (Share Market )आहे ज्याने गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला आहे. UPL Ltd ही भारताबरोबरच जगातील सर्वात मोठी अॅग्रोकेमिकल कंपन्यांपैकी एक आहे. गेल्या 2 दशकांमध्ये या कंपनीने सातत्याने आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा दिला आहे.

16 सप्टेंबर रोजी NSE वर UPL Ltd चे शेअर्स 704.55 रुपयांवर बंद झाले. 20 वर्षांपूर्वी जेव्हा 5 जुलै 2022 रोजी UPL शेअरनी प्रथम NSE वर व्यापार सुरू केला तेव्हा त्याची किंमत फक्त 1.20 रुपये होती. तेव्हापासून त्याची किंमत सुमारे 58,612.50 टक्क्यांनी वाढली आहे.

जर एखाद्या गुंतवणूकदाराने आजपासून 20 वर्षांपूर्वी UPL Ltd च्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याचे 1 लाख रुपयांचे मूल्य 58,612.50% ने वाढून 5.87 कोटी रुपये झाले असते.

जर एखाद्या गुंतवणूकदाराने त्यावेळी केवळ 18 हजार रुपये गुंतवले असते तर आज त्याच्या 18 हजार रुपयांचे 1 कोटी 5 लाख रुपये झाले असते आणि तो करोडपती झाला असता.

गेल्या 5 वर्षात या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे 31 टक्के परतावा दिला आहे. यूपीएल लिमिटेडच्या शेअर्सच्या अलीकडील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर गेल्या एका महिन्यात ते सुमारे 10.87 टक्क्यांनी घसरलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

जिओकडून सर्वात स्वस्त प्लॅनची घोषणा, अनलिमिटेड कॉलिंगसह नेटही मिळणार!

“आदित्यला काय कळतं, कोण ओळखतं त्याला?”

Leave a Reply

Your email address will not be published.

4 × three =