Post Office | पोस्टाची भन्नाट योजना; तुमचे पैसे होतील डबल

Read Time:2 Minute, 1 Second

मुंबई | आपल्याकडं असणारा पैसा हा गुंतवणूक करून फायदा मिळवावा असं प्रत्येकाला वाटत असतं. पोस्ट (Post Office) ऑफिस आणि बॅंकेच्या माध्यमातून आपण गुंतवणूक करत असतो. लघू आणि मध्यम बचतीच्या काही आकर्षक योजना पोस्ट ऑफिस घेऊन आलं आहे. या योजनेत फायदा सुद्धा जास्त आहे.

आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या अशा स्कीमबद्दल सांगणार आहोत जिथे तुम्हाला फक्त एकदाच गुंतवणूक करावी लागेल आणि तुम्हाला मॅच्युरिटीवर दुप्पट पैसे मिळतील.

आम्ही किसान विकास पत्र (KVP) बद्दल बोलत आहोत. तुम्ही या योजनेत 1000 ने गुंतवणूक सुरू करू शकता. कमाल गुंतवणुकीची मर्यादा नाही.

त्याचा मॅच्यरिटी कालावधी 124 महिने (10 वर्षे 4 महिने) आहे. ही योजना खास शेतकऱ्यांसाठी बनवण्यात आली आहे जेणेकरून त्यांना दीर्घकाळ गुंतवणूक करता येईल.

18 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचा कोणताही भारतीय नागरिक यामध्ये गुंतवणूक करू शकतो. या योजनेचा लॉक-इन कालावधी देखील 2.5 वर्षांचा आहे.

तुम्ही ही योजना सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधून देखील खरेदी करू शकता. येथे तुम्हाला गुंतवणुकीवर चक्रवाढ व्याज मिळते, त्यामुळे तुमचे पैसे मॅच्युरिटीवर दुप्पट होतात. जर तुम्ही यामध्ये 5 लाख रुपये गुंतवले तर 124 महिन्यांनंतर ही रक्कम दुप्पट होऊन 10 लाख रुपये होईल.

 

Leave a Reply

Your email address will not be published.

four × 3 =