Palak Tiwari| श्वेता तिवारीच्या लेकीच्या हॉट अदांनी उडाली चाहत्यांची झोप

Read Time:2 Minute, 2 Second


मुंबई। प्रसिद्ध टेलिहिव्हिजन अभिनेत्री श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारी सुद्धा कुठे कमी नाही. आपल्या आईच्या पावलावर पाऊल ठेऊन तिने सुद्धा चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. पलक तिवारी सोशल मीडियावर खूपच चर्चेत असते. आता पुन्हा एकदा पलक तिच्या नवीन फोटोशूट मुले चर्चेत आली आहे. या फोटोशूटमध्ये तिने असा कोणता लूक केला ज्यामुळे तिच्या फोटोची चर्चा चालू आहे. (Palak Tiwari Hot Photoshoot)

पलकने तिचे नवीन फोटोशूट तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले आहेत. पलकने केलेल्या फोटोशूटमध्ये पांढऱ्या रंगाचा नेटेड टॉप आणि पँट घातली आहे. तसेच तिने यावर हाय हिल्स घालून हटके पोज दिली आहे. तिने या फोटोशूटमध्ये न्यूड असं मेकअप केलं आहे.

तिच्या या मेकअपने तिचं सौंदर्य एकदम उजळून दिसत आहे. त्यामुळे तिचे फॅन्स तिच्या या पोस्टवर भरभरून कमेंट्स करताना दिसत आहेत. याशिवाय पलक तिच्या चाहत्यांसाठी नवीन फोटोशूट करून त्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

तिचे हे फोटोशूट सोशल मीडियावर चांगलेच धुमाकूळ घालत आहेत. या सोबतच नेटकरी तिच्या फोटोला ब्यूटीफुल, हॉट, बोल्ड असं म्हणत कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत. कामाबद्दल बोलायचं म्हटलं तर सलमान खानच्या आगामी चित्रपटात पलक काम करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

10 − 6 =