MBA चहावाल्यानंतर Post Graduate चहावालीची सगळीकडेच चर्चा

Read Time:3 Minute, 19 Second


नवी दिल्ली | सध्या वाढती लोकसंख्या आणि वाढती बेरोजगारी (Unemployment) यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. अगदी लाख दिड लाख रुपये खर्च करुन शिक्षण घेऊन युवकांना आठ दहा हजार रुपयांमध्ये नोकरी करावी लागत आहे. आयटी (IT) झालेल्या युवकांना जाॅब नसल्याने मिळेल ते काम करण्याची गरज वाटू लागली आहे.

मध्यंतरी धुमाकूळ घातलेल्या कोरोनाने अनेकांना बेरोजगार केलं आहे. यामुळे सध्या तरुणांमध्ये नैराश्याचे (Depression) प्रमाणही वाढल्याचं पाहायला मिळत आहे.

मात्र, अनेक युवक निराश न होता नवीन पर्याय शोधत आहेत. याचच उदाहरण म्हणजे एमबीए चायवाला किंवा गॅज्युएट चायवाली ज्यांनी अगदी उच्चपदाचं शिक्षण (Higher education) घेतलं पण नोकरी मिळत नसल्यामुळे त्यांनी हा बिझनेस सुरु केला.

याचप्रमाणे सध्या पोस्ट ग्रॅज्युएट चहावाली हिचं नाव चर्चेत आहे. झारखंडमधील (Jharkhand) एक राधा यादव नावाच्या मुलीने चहाचा स्टाॅल सुरु केला आहे. सध्या ती महिन्याचे 50 हजार कमवत आहे.

घरीची परिस्थिती इतकी बरी नाही यातही राधानं तिचं पोस्ट ग्रॅज्युएशन (Post Graduate) पूर्ण केलं. पूर्वी ती एका खाजगी संस्थेत काम करत होती. कोरोनाच्या काळात तिची नोकरी गेली. यावेळी मात्र पंचायत झाली. काय करावं हे राधाला समजत नव्हतं.

देवघरपासून 5 किमी अंतरावर असलेल्या देवघर ब्लॉकच्या कोठिया गावातील असलेल्या राधाला 5 बहिणी आणि 1 भाऊ आहे. या सर्वामध्ये राधा मोठी आहे. सर्व भाऊ- बहिण सध्या शिक्षण घेत आहेत. तिझ्यावर घरची जबाबदारी आहे.

यावेळी राधानं चहाचा गाडा टाकण्याचा निर्णय घेतला. सुरवातीला खरतर ती खूप अस्वस्थ होती. तिनं तिचा निर्धार पक्का केला आणि देवपुर मधल्या रामला बजाला महिला काॅलेजच्या समोर तिनं गाडा टाकला. चहाचा बिझनेस (business) सुरु केला.

काॅलेजसमोर गाडा सुरु केल्याने काॅलेजच्या मुली चहा पितात. राधा जो चहा बनवते तो ती मातीच्या भांड्यात देते. त्यामुळे ‘मातीच्या भाड्यांत चहा प्या आणि देशाच्या मातीच चुंबन घेण्याची संधी मिळवा’ अशी टॅगलाईन (Tagline) दिली आहे.

राधा सध्या चहाच्या स्टॉलमधून तिचं घर चालवत आहे. राधाने जे काम केले ते कौतुकास्पद (Admirable) आहे असं स्थानिक लोकांचं म्हणणं आहे.

थोडक्यात बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published.

eight + ten =