LIC ची भन्नाट योजना! फक्त 29 रूपये रूपये गुंतवून मिळू शकतात लाखो रूपये

Read Time:2 Minute, 0 Second

मुंबई | भविष्याचा विचार करून एखाद्या चांगल्या योजनेत गुंतवणूक (Investment) करण्यावर लोकांचा भर वाढला आहे. जीवन विम्याच्या (LIC) अशा काही योजना आहेत ज्यात तुम्हाला मॅच्युरीटीनंतर चांगला परतावा मिळतो.

एलआयसीने एक योजना सुरू केली आहे. या योजनेचं नाव आधार शिला योजना असं आहे. यामध्ये महिलांनी अगदी कमी गुंतवणूक करून एक मोठी निधी मिळवू शकतात.

तुम्ही 20 वर्षे दर महिन्याला 899 रुपये जमा केले तर पहिल्या वर्षी तुम्ही फक्त 10,959 रुपये जमा कराल. जर तुम्ही 20 वर्षांसाठी जमा केले तर 20 वर्षांत एकूण 2 लाख 14 हजार रुपयांची गुंतवणूक होईल.

8 ते 55 वयोगटातील महिला एलआयसीच्या या योजनेत गुंतवणूक करू शकतात. या योजनेत तुम्ही दररोज 29 रुपये जमा करायचे आहेत. तुम्हाला मॅच्युरिटीवर 4 लाख रुपये मिळू शकतात.

ज्यामध्ये तुम्हाला पॉलिसीच्या मॅच्युरिटीवर 3 लाख 97 हजार रुपये मिळतील. या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करून महिला आपलं भविष्य सुरक्षित करू शकतात आणि 20 वर्षांनंतर मोठी त्यांना मिळेल.

तुम्हाला किमान 10 तर कमाल 20 वर्षासाठी गुंतवणूक केली तर फायदा जास्त मिळतो. यामध्ये 3 लाख रुपयांपर्यंत तुम्ही पैसे गुंतवू शकता. 70 वर्षांपर्यंत तुम्ही ही स्कीम एक्स्टेंड करू शकता. प्रीमियमचे पैसे तुम्ही महिना, तिमाही किंवा सहा महिन्यांनी भरू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

11 − 5 =