IPO मध्ये गुंतवणूक केेली असेल तर ही आनंदाची बातमी तुमच्यासाठीच

Read Time:3 Minute, 29 Secondनवी दिल्ली । शेअर बाजारात गुंतवणूक करत असताना इनिशिअल पब्लिक ऑफरिंग म्हणजेच IPO हा एक चांगला पर्याय आहे. यात तुम्ही कमीत कमी गुंतवणूक करून जास्तीत जास्त नफा मिळवू शकता. या वर्षाच्या सुरूवातीला जरी IPO च्या शेअर विक्रीमध्ये घसरण झाली होती. पण त्या काळातसुद्धा IPO कडून गुंतवणुकदारांना सरासरी 50% इतका परतावा देण्यात आला होता. तर BSE सेन्सेक्स 1.6 टक्के वाढला.

शेअर बाजारासंबंधित एका कार्यक्रमात सांगण्यात आलं की, IPO मधून उभारण्यात आलेल्या रकमेत यावर्षी लक्षणीय घट झाली आहे. त्यानुसार 2022 मध्ये आतापर्यंत आलेल्या 51 IPO मधून 38,155 कोटा रुपये उभारण्यात यश आलं आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत 55 IPO मधून 64,768 कोटी रुपये जमा झाले होते. यावर्षी सर्वाधिक 20,500 कोटी रुपये भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (LIC) च्या IPO मधून उभारले गेले.

गेल्यावर्षीबद्दल जर बघितलं तर 33 कंपन्यांच्या माहितीवरून 1,000 कोटींहून अधिक रक्कम जमा झाली. बँक ऑफ बडोदाच्या अर्थतज्ञ दिपन्विता मजुमदार यांनी हा माहिती अहवाल तयार केला आहे. या अहवालानुसार IPO ने सप्टेंबर 2021 पर्यंत 74 टक्के परतावा दिला हेता. तोपर्यंत सेन्सेक्स 20 टक्के वाढला होता. मात्र 1000 कोटींहून अधिक रकमेच्या IPO पैकी 16 कंपन्यांचे समभाग सध्या कमी किमतीत विकले जात आहेत.

2021 मध्ये कंपन्यांनी शेअर बाजारातून 1,21,680 कोटी रुपये उभे केले होते. परंतु या काळात एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत सेन्सेक्सनेही 40,000 अंकांवरून 60,000 अंकांच्या जवळपास झेप घेतली. त्यातुलनेत यावर्षी शेअर बाजारात बरीच अस्थिरता दिसत आहे. ती 50,000 ते 60,000 अंकांच्या श्रेणीत व्यवहार करत आहे. यावर्षी नकारात्मक परतावा देणाऱ्या कंपन्यांची संख्या 40 टक्के आहे तर 45 टक्के कंपन्यांना 20 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.

One 97 Communications 9 (Paytm) या कंपनीमध्ये सर्वात जास्त तोटा आहे. ज्यामध्ये इश्यू किमतीपासून 67 टक्के तोटा झाला आहे. LIC च्या शेअरची किंमतही इश्यूच्या किमतीपेक्षा 31 टक्क्यांनी घसरली आहे. तर झोमॅटोचा शेअर 20.7 टक्क्यांना घसरला आहे. तर दुसरीकडे अदाणी विल्मारचा शेअर खरेदी किमतीपासून 205.6 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. दुसरीकडे सोना प्रिसीजन, पतंजली फुड्स आणि पावरग्रीड आघाडीवर आहेत.Leave a Reply

Your email address will not be published.

two × one =