FRPपेक्षा जास्त दर देणार, ‘या’ साखर कारखान्याचा शेतकऱ्यांना सुखद धक्का

Read Time:1 Minute, 43 Second


सांगली | क्रांती साखर कारखान्याने शेतकऱ्यांना सुखद धक्का दिला आहे. क्रांती कारखाना शेतकऱ्यांना FRP पेक्षा जास्त रक्कम शेतकऱ्यांना देत आहे. क्रांती कारखाना शेतकऱ्यांना FRP पेक्षा 80 रूपये जास्त देत आहेत. यातले 40 रूपये विकास निधी म्हणून तर उरलेले 40 रूपये शेतकऱ्यांच्या खात्यावर दिवाळीआधी जमा केले जाणार आहेत, असं आमदार अरूण लाड यांनी सांगितलं आहे.

कारखान्याची 2975 रूपये एफआरपी असताना यावर्षी 3055 रूपये देत आहोत, असं लाड यांनी सांगितलं आहे. ते कारखान्याच्या 26 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते.

उस नोंदीची होणारी दिरंगाई टाळण्यासाठी शेतावरच उसाची नोंदणी घेतली जात आहे. शेतकऱ्यांना वेळेत ऊस तोडणी मिळावी यासाठी कारखान्याची क्षमता साडेसात हजार टन केल्याची माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिलीये.

शेती आणि शेतकऱ्यांवर किती संकटे आली तरी कारखाना शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, असंही अरूण लाड म्हणालेत.

थोडक्यात बातम्या- 

भाजपमध्ये खळबळ; पंकजा मुंडेंनी थेट मोदींना दिलं आव्हान

“…तर पंतप्रधान नरेंद्र मोदीही आपल्याला संपवू शकणार नाहीत”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

2 × two =