आंबेडकरी जनतेने सहभागी होण्याचे प्रा. राजू सोनसळे यांचे आवाहन – VastavNEWSLive.com
नांदेड -परभणी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या आरोपीस कठोर शिक्षा करावी या मागणीसाठी आज दिनांक 13 डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता महात्मा फुले पुतळ्यासमोर आयटीआय येथे रिपब्लिकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष प्रा. राजू सोनसळे यांच्या नेतृत्वात तीव्र निदर्शने करण्यात येणार आहेत.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या परभणीतील पुतळ्या समोरील संविधानाची प्रतिकृतीची एका जात्यांध युवकाकडून नाददूस करण्यात आली .
संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली. त्यामुळे परभणीत तीव्र संताप व्यक्त करत आंबेडकरी जनतेने आंदोलन उभारले असता प्रशासनाने पोलिसीबळाचा वापर करत अमानुष लाठीचार्ज केला. एकीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची विटंबन करणे आणि दुसरीकडे डॉ. बाबासाहेबांच्या कायद्याची पायमल्ली करत सर्वसामान्य नागरिकांवर बेछूट लाठीचार्ज करणे अशी हुकूमशाही महाराष्ट्रात सुरू असल्याने या हुकूमशाहीचा निषेध करण्यासाठी आणि संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या देशद्रोह्याला तात्काळ अटक करून त्याच्याविरुद्ध कठोर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी आज दिनांक 13 डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता आयटी येथे महात्मा फुले पुतळ्यासमोर तीव्र आंदोलने करण्यात येणार आहेत.
या आंदोलनात आंबेडकरी अनुयायांनी आणि संविधान प्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संयोजक तथा रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. राजू सोनसळे यांनी केले आहेत.
Post Views: 48