नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत 5 लाख 46 हजार रुपयांचा ऐवज लंपास; शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रोख 2 लाख रुपयांचा डाका; नरसी बसस्थानकात महिलेचे मंगळसूत्र तोडले
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत ऍटो प्रवास करतांना 5 लाख 46 हजार रुपयांचा ऐवज लंपास झाला आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चाकूचा धाक दाखवून 2 लाख रुपयांची लुट झाली आहे. नरसी बस स्थानकात बसमध्ये प्रवेश करण्याच्या गर्दी आणि घाईचा फायदा घेवून चोरट्यांनी एका महिलेचे 22 हजार 500 रुपयांचे मनीमंगळसूत्र चोरून नेले आहे.
भगवान तुकाराम केंद्रे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.27 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.30 ते 12 वाजेदरम्यान ते भगवानबाबा चौक नांदेड पर्यंत ऍटोने प्रवास करत असतांना अज्ञात चोरट्यांनी त्यांची दिशाभुल करून त्यांच्याकडे असलेले सोन्याचे गंठण, झुमके, अंगठी असा 5 लाख 46 हजार रुपयांचा ऐवज नजर चुकवून चोरला आहे. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीसांनी 1111/2024 हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक एम.एस.गायकवाड हे अधिक तपास करीत आहेत.
माधव किशनराव मोरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 18 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजताा ते आपली दुचाकी क्रमांक एम.एच.26 वाय 1713वर बसून मगनपूराकडे येत असतांना वसंतनगर कॉर्नरजवळ त्यांच्या पाठीमागून दोन अज्ञात इसम आले त्यांचे वय 25 ते 30 वयोगटाचे आहे. त्यांनी माधव मोरे यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याजवळ असलेली दोन लाख रुपये रोख रक्कम ठेवलेली बॅग बळजबरीने हिसकावून नेली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीसांनी गुन्हा क्रमांक 443/2024 दाखल केला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक सुभाष माने हे करीत आहेत.
नरसी बसस्थानकात सौ.सम्रता विश्र्वनाथ भालेराव या 29 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजेच्यासुमारास मुखेडला जाण्यासाठी नरसी बसस्थानकात बसमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्नकरत असतांना प्रवाशांची घाई आणि तेथील गर्दीचा फायदा घेवून अज्ञात चोरट्यांनी सम्रता भालेरावला धक्का दिला आणि त्यांच्या गळ्यातील 7 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मनीमंगळसूत्र 22 हजार 500 रुपये किंमतीचे चोरून नेले आहे. रामतिर्थ पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 306/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार सूर्यवंशी हे करीत आहेत.
प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक गुन्हा शाखा असता मागील तीन दिवसांपासून सतत अशाच प्रकारच्या चोऱ्या होत आहेत. त्यामध्ये लाखो रुपयांचा ऐवज चोरटे लंपास करत आहेत. जिल्ह्याच्या स्थानिक गुन्हा शाखेला जिल्ह्यात घडणाऱ्या प्रत्येक गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे अधिकार असतात. पण नांदेडमध्ये घडणाऱ्या या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी बहुदा स्थानिक गुन्हा शाखेतील नियमित नियुक्ती प्राप्त असलेले आणि नियुक्ती नसतांना सुध्दा स्थानिक गुन्हा शाखेचे काम करणाऱ्या पोलीसांना वेळच नाही असे दिसते.
Post Views: 42