आनंदाने जीवन जगा-सुरज गुरव – VastavNEWSLive.com
नांदेड(प्रतिनिधी)-आजच्यानंतर काम वेळेत झाले नाही तर साहेब रागवेल ही तुमची भिती समाप्त झाली आहे. तेंव्हा फक्त आपल्या कुटूंबासाठी तुमचा वेळ द्या आणि भविष्याचे जीवन अत्यंत आनंदाने जगा असे प्रतिपादन नांदेडचे अपर पोलीस अधिक्षक सुरज गुरव यांनी केले.
आज नांदेड जिल्ह्यातून दोन श्रेणी पोलीस उपनिरिक्षक, एक सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक आणि एक वरिष्ठ श्रेणी लिपीक आपला सेवाकाळ संपल्यानंतर सेवानिवृत्त झाले. त्यांना उद्देशून अपर पोलीस अधिक्षक सुरज गुरव हे बोलत होते.
आज नांदेड जिल्हा पोलीस दलातील श्रेणी पोलीस उपनिरिक्षक प्रभु किशनराव केंद्रे(उस्माननगर पोलीस ठाणे), सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक खोब्राजी कोंडीबा हंबर्डे आणि मंत्रालयीन विभागातील वरिष्ठ श्रेणी लिपीक अरुण केशवराव टिके यांनी आपला सेवाकाळ पुर्ण केल्याने सेवानिवृत्ती मिळाली. त्यांना निरोप देतांना सुरज गुरव बोलत होते. याप्रसंगी पुढे बोलतांना सुरज गुरव म्हणाले पुर्ण सेवाकाळात तुम्हाला याची भिती वाटायची की, आपल्याल दिलेले काम योग्यवेळेत झाले नाही तर साहेब रागवेल आता ही भिती संपलेली आहे. तेंव्हा आपल्या सेवानिवृत्तीनंतरचा जास्तीत जास्त काळ कुटूंबासोबत व्यतित करा. सेवाकाळामध्ये ज्या नातलगांच्या भेटी झाल्या नाहीत, ज्या नातलगांच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला जाता आले नाही. त्या सर्वांसाठी आपला वेळ द्या आणि आनंदाने जीवन जगा. आज तुम्ही पोलीस नसलात तरी तुम्हाला माहित असलेल्या बाबींबद्दल जनतेला मार्गदर्शन करा. जनतेच्या अडचणीसाठी त्यांना सोबती व्हा कारण तुम्ही सेवेत असतांना सुध्दा जनतेला सेवा दिल्या आहेत. पण आता त्यातील मर्यादा संपणार आहे.
या कार्यक्रमात सर्व सेवानिवृत्तांना त्यांच्या कुटूंबासह सन्मानीत करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन पोलीस कल्याण विभागाचे पोलीस निरिक्षक नामदेव रिठ्ठे यांच्या नेतृत्वात पोलीस अंमलदार शेख शमा, सविता भिमलवाड आणि विनोद भंडारे यांनी केले.
Post Views: 284