लोकसभेचे रिपब्लिकन सेनेचे उमेदवार प्रा. राजू सोनसळे यांचा आज प्रचाराचा शुभारंभ
नांदेड -नांदेड लोकसभा मतदारसंघाचे रिपब्लिकन सेना आणि मित्र पक्षाचे उमेदवार प्रा. राजू सोनसळे यांच्या प्रचाराचा शुभारंभ दिनांक 4 नोव्हेंबर रोजी जेतवन मैदान फायर स्टेशन जवळ आंबेडकर नगर नांदेड येथे सायंकाळी 7 वाजता करण्यात येणार आहे वरिष्ठ नेत्यांचं मित्र पक्षाचेही नेते उपस्थित राहणार आहेत. यावेळी प्रबोधनकार , लोकशाहीर आनंदराव कीर्तने यांचा लोकप्रधानाचा कार्यक्रमही पार पडणार आहे.
माधवदादा जमदाडे (प्रदेश सचिव), श्रीपती ढोले (प्रदेश सचिव), प्रतिक मोरे (८६, नांदेड उत्तर विधानसभा उमेदवार),अनिल सिरसे (जिल्हाध्यक्ष, नांदेड दक्षिण), प्रशांत गोडबोले (युवक जिल्हाध्यक्ष, नांदेह दक्षिण), सय्यद इलयाज पाशा (नेते, रिपब्लिकन सेना), रवि हाडसे (युवक जिल्हाध्यबा, नांदेड उत्तर), राहुल चिखलीकर (अध्यक्ष, बहुजन लोकन्याय संघ), संदिप मांजरमकर (मा. जिल्हाध्यक्ष, रिपब्लिकन सेना, नदिड उत्तर), रूपेश सोनसळे (नेते, रिपब्लिकन सेना), संतोषकुमार साळवे (जिल्हाध्यक्ष, कामगार सेना, नांदेड), सिद्धार्थ कांबळे बेळीकर (जिल्हा प्रवक्ता, नांदेड), शंकर थोरात (जिल्हा महासचिव, नांदेड) , अंकुश सावते (विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष, नांदेड) , प्रेमिलाताई वाघमारे (भाजी जिल्हाध्यक्ष महिला आघाडी, नांदेड) आदींची उपस्थिती राहणार आहे.
आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेला आंबेडकरी विचारधारीच्या सर्व नागरिकांनी आणि मतदारांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
Post Views: 17