नांदेड जिल्हा पोलीस दलासाठी 39 नवीन चार चाकी वाहने
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलाने 39 नवीन चार चाकी वाहने खरेदी केली आहेत. त्या गाड्यांना आज पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांनी हिरवा झेंडा दाखवून पोलीस दलात सामील करून घेतले.
सध्याच्या निवडणुकांचा काळ लक्षात घेता नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी डीपीडीसीमधून पोलीस विभागाला वाहने खरेदी करण्यासाठी निधी मंजुर केला होता. आज ही सर्व वाहने पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर आली होती. या 39 वाहनांमध्ये 22 बोलेरो, 15 स्कॉरपीओ आणि 2 थार वाहने आहेत. पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप, पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांच्या हस्ते या वाहनांचे पुजन करण्यात आले आणि ही सर्व 39 वाहनांने पोलीस दलाच्या कामाकाजासाठी वापरली जाणार आहेत.
या कार्यक्रमाचे नियोजन मोटार परिवहन विभागाचे पोलीस निरिक्षक चोपडे, राखीव पोलीस निरिक्षक विजय धोंडगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले.