सोयाबीनचे पिक चोरले – VastavNEWSLive.com
नांदेड (प्रतिनिधी)-शेतात सोयाबीनचे पिक रास करून ठेवले असतांना पती-पत्नीने ती सोयाबीनची रास चोरून नेली आहे. हा प्रकार मौजे बाभुळगाव ता.जि.नांदेड येथे घडला आहे. चोरुन नेलेले सोयाबीन 16 क्विंटल आहे.
शंकर दादाराव जाधव रा.किरोडा ता.लोहा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 16 ऑक्टोबर रोजी रात्री 10 वाजेच्यासुमारास त्यांच्या शेतात कापून ठेवलेले सोयाबिनचे पिक वजन 16 क्विंटल किंमत 48 हजार रुपये हे धोडींबा तुकाराम मस्के आणि माधुरी तुकाराम मस्के या दोघांनी चोरून नेले आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी हा प्रकार गुन्हा क्रमांक 944/2024 प्रमाणे दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार तेलंग हे करीत आहेत.
Post Views: 68