Sudhir Mungantiwar Clarifies Delhi Visit, Targets INDIA Alliance
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या दिल्ली दौऱ्याबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देत, आपण मंत्रिमंडळ विस्तार किंवा मंत्रिपदासाठी दिल्लीला गेलेलो नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्याचवेळी त्यांनी INDIA आघाडीच्या नेतृत्वा
.
मोदींच्या 12 वर्षांच्या कार्यकाळाचे कौतुक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग 12 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्याच्या पार्श्वभूमीवर मुनगंटीवार म्हणाले की, हा देशासाठी महत्त्वाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विक्रमापेक्षा अधिक काळ पंतप्रधान म्हणून सेवा देण्याची संधी मोदींना मिळाली असून, जनतेने त्यांच्या नेतृत्वावर सातत्याने विश्वास दाखवला आहे, असे त्यांनी सांगितले. त्यांनी नेहरू आणि मोदी यांच्या कार्यकाळाची थेट तुलना होऊ शकत नसल्याचेही नमूद केले. दोघांपुढील आव्हाने आणि परिस्थिती वेगळी होती, असे ते म्हणाले.
‘दिल्ली दौरा विकासकामांसाठी होता’
अलीकडे झालेल्या दिल्ली दौऱ्याबाबत बोलताना मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले की, त्यांचा दौरा पूर्णपणे मतदारसंघातील विकासकामांशी संबंधित होता. “मी मंत्रिमंडळ विस्तारासाठी किंवा मंत्रिपदाच्या चर्चेसाठी दिल्लीला गेलो नव्हतो. माझ्या मतदारसंघासाठी निधी आणि विकासकामांच्या पाठपुराव्यासाठी गेलो होतो,” असे त्यांनी स्पष्ट केले. मंत्रीपद हा आपल्यासाठी कधीही महत्त्वाचा विषय राहिलेला नाही, असे सांगत त्यांनी सात वेळा जनतेने निवडून दिले, हेच आपल्यासाठी सर्वात मोठे बक्षीस असल्याचे नमूद केले. “जी जबाबदारी मिळेल ती प्रामाणिकपणे पार पाडायची, हीच माझी भूमिका आहे,” असेही ते म्हणाले.
INDIA आघाडीच्या पंतप्रधानपदाच्या चेहऱ्यावर टीका
INDIA आघाडीच्या बैठकीत पंतप्रधानपदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी पुढे आल्याच्या चर्चांवर मुनगंटीवार यांनी उपरोधिक प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “INDIA आघाडीने पंतप्रधानपदाचा चेहरा जाहीर करणे म्हणजे मध्यरात्री सूर्य उगवण्यासारखे आहे. ज्या दिवशी ते चेहरा जाहीर करतील, त्या दिवशी आघाडी तुटेल.” उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानपदाचा चेहरा स्पष्ट करण्याची मागणी केल्याचा संदर्भ देत, हा मुद्दा आघाडीतील अंतर्गत मतभेद अधिक उघड करणारा ठरू शकतो, असा दावा त्यांनी केला. मुनगंटीवार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही टीका केली. राहुल गांधी कधीही देशाचे पंतप्रधान होऊ शकणार नाहीत, असे विधान करत त्यांनी INDIA आघाडीच्या नेतृत्वाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांमध्ये आपले नाव घेतले जात असल्याबद्दलही त्यांनी प्रतिक्रिया दिली. मंत्रिपद मिळेल की नाही, याची चिंता आपण कधीच केली नसल्याचे सांगत विकासकामे आणि जनतेची सेवा हेच आपले प्राधान्य असल्याचे त्यांनी पुन्हा स्पष्ट केले.
संबंधित बातमी वाचा
INDIA आघाडीत नवा राजकीय ‘बॉम्ब’!:उद्धव ठाकरेंची थेट मागणी; ‘पंतप्रधानपदाचा चेहरा जाहीर करा, समन्वयकही ठरवा’

आगामी लोकसभा निवडणुकांच्या तयारीला लागलेल्या INDIA आघाडीत नेतृत्वाच्या मुद्द्यावरून नवी चर्चा सुरू झाली आहे. विरोधी पक्षांच्या महत्त्वाच्या बैठकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आघाडीसमोर दोन महत्त्वाच्या मागण्या ठेवल्याची माहिती समोर आली आहे. INDIA आघाडीने तातडीने एक सक्षम समन्वयक नियुक्त करावा आणि जनतेसमोर पंतप्रधानपदाचा चेहरा स्पष्ट करावा, अशी भूमिका ठाकरे यांनी मांडल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. या भूमिकेमुळे विरोधी पक्षांच्या आघाडीत नेतृत्वाच्या प्रश्नावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली असून आगामी राजकीय रणनीतीवर त्याचे परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सविस्तर बातमी
