Talegaon MIDC | तळेगाव एमआयडीसी हादरली! ‘या’ कंपनीतील २ कामगारांचा जागीच मृत्यू

0
Talegaon-Industrial-Hub.webp.webp


Talegaon MIDC | पुणे (Pune) जिल्ह्यातील मावळ (Maval) तालुक्यात मोठी औद्योगिक दुर्घटना घडली आहे. तळेगाव एमआयडीसी (Talegaon MIDC) परिसरातील एका कंपनीमध्ये कार्बन डायऑक्साइड (CO₂) गॅसची गळती झाल्याने दोन कामगारांचा मृत्यू झाला असून आणखी तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मावळ तालुक्यातील नवलाख उंबरे (Navlakh Umbre) येथील शॅफ्लर इंडिया (Schaeffler India) कंपनीमध्ये ही घटना घडली. सुरुवातीला सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र तपासानंतर कार्बन डायऑक्साइड गॅसची गळती झाल्याचे स्पष्ट झाले. या अपघातात गणेश उंबरे (Ganesh Umbare) आणि वैभव थोरात (Vaibhav Thorat) या दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला.

या दुर्घटनेत श्रीकृष्ण साहू (Shrikrishna Sahu), गौरीशंकर शर्मा (Gaurishankar Sharma) आणि नरसिंह पाटील (Narsingh Patil) हे तीन कामगार जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच कंपनी प्रशासन, एमआयडीसी सुरक्षा यंत्रणा आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. गॅस गळतीमागील नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे.

Talegaon MIDC | मेंटेनन्सदरम्यान घडला अपघात :

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी सुमारे साडेबारा वाजण्याच्या सुमारास उषा फायर सेफ्टी इक्विपमेंट (Usha Fire Safety Equipment) कंपनीचे कर्मचारी शॅफ्लर इंडिया (Schaeffler India) कंपनीत वार्षिक देखभाल आणि सर्व्हिसिंगचे काम करत होते. यावेळी कंत्राटी कामगार आणि कंपनीचे कर्मचारी संयुक्तपणे काम करत असताना ही दुर्घटना घडली.

पोलीसांच्या प्राथमिक माहितीनुसार, कार्बन डायऑक्साइड सिलेंडरची सेफ्टी पिन सैल झाल्याने उच्च दाबाने गॅस बाहेर पडू लागला. मोठ्या प्रमाणात गॅस गळती झाल्याने उपस्थित कामगारांना श्वास घेण्यास अडचण निर्माण झाली आणि काही जण बेशुद्ध पडले. या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून तीन जणांवर उपचार सुरू आहेत. आंबी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील (Santosh Patil) यांनी सांगितले की, घटनेचा सखोल तपास सुरू असून अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.

News Title: Two Dead in Talegaon Gas Leak

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *