'मुख्यमंत्र्यांना भेटायला मुलगा अन् पुतण्याला घेऊन गेले':लक्ष्मण हाकेंचा व्हिडिओ व्हायरल; नेमका रोख कोणावर? हाके काय म्हणाले?

0
copy-of-db-temp-cover-marathi-2026-06-09t181840856_1781009320.jpg




ओबीसी आरक्षण नेते लक्ष्मण हाके यांच्या एका व्हिडिओने खळबळ उडाली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हाके एका मोठ्या नेत्याविषयी बोलताना दिसून आले आहेत. तसेच हाके यांनी त्या नेत्यावर गंभीर आरोप देखील केले आहेत. हा व्हिडिओ समोर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. तसेच हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लक्ष्मण हाके यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. तत्पूर्वी आपण त्या व्हायरल व्हिडिओमध्ये हाके नेमके काय म्हणाले ते पाहूया. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये लक्ष्मण हाके म्हणतात की, त्याची आपल्यामागे फरपट होत आहे. त्यांचे कसे आहे त्यांच्याकडे आहे यंत्रणा, त्यांच्याकडे आहे संघटन. मीडिया हॅंडल करणे, मोठा स्टेज डेकोरम देणे, मीडियाल प्रॉपर बातमी देणे. ते म्हणाले आंदोलन करायचे नाही. मी दुसऱ्या दिवशी जाहीर केले, महाराष्ट्रातल्या लोकांनी जीआर फाडाव, होळी करावी, रस्त्यावर उतरावे, निवेदन द्यावी. बोलला होता न काही करायचे नाही म्हणून. माझ्या उपस्थितीत म्हणाला होता आंदोलन थांबवा, स्टेजवरच होतो न मी पण. पुढे लक्ष्मण हाके म्हणतात, हा मुख्यमंत्र्यांना दोन उपमुख्यमंत्र्यांना भेटायला गेलाय. घेऊन कोणाला गेलाय, स्वतःचा मुलगा, स्वतःचा पुतण्या. हे तिघेजण गेले आणि सभेत सांगत आहे की, ते तिघेजण होते आणि आम्ही तिघे होतो. मला लय ते वाक्य खटकले होते, पण जाऊदे म्हटलं. आपल्याला सॉफ्ट कर्नर फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे आणि बावनकुळे हे आहेत, असेही हाके यांनी म्हटले आहे. मात्र ते नेमके कोणत्या नेत्याबद्दल बोलत होते ते समजू शकले नाही. लक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लक्ष्मण हाके यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, कोणता व्हिडिओ आहे, कधीचा व्हिडिओ आहे, तो पूर्ण दाखवला जात नाही. मी ओबीसींच्या प्रश्नावर भांडत आहे, लढत आहे, रात्रंदिवस पळत आहे. त्यावर कोणी बोलत नाही. अशा गोष्टींमधून काय सध्या करायचे आहे? असा सवाल हाके यांनी उपस्थित केला आहे. ओबीसींच्या मुद्द्यावर कोणीही बोलायला तयार नाही. या लोकांचा उद्देश लक्ष्मण हाकेला डॅमेज करणे हा आहे. पण हाके डॅमेज होणाऱ्यातला नाही. मी बोलायचे थांबवणार नाही, असे हाके यांनी म्हटले असले तरी त्यांना नेमके कॉमन डॅमेज करायचा प्रयत्न करत आहे याविषयी त्यांनी काही सांगितलेले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *