नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी 8 मतदान केंद्रे निश्चित; 452 मतदार बजावणार मतदानाचा हक्क

0
vidhanbhavan.jpeg


नांदेड (प्रतिनिधी)- महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक 2026 अंतर्गत नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी अंतिम मतदान केंद्रांची यादी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यातील विविध नगरपरिषदा, नगरपंचायती आणि महानगरपालिकांमधील एकूण 452 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून त्यांच्यासाठी 8 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.

निवडणूक प्रशासनाने जाहीर केलेल्या यादीनुसार किनवट तहसील कार्यालय येथे किनवट नगर परिषद व माहूर नगरपंचायतीचे मिळून 41 मतदार मतदान करणार आहेत. हदगाव तहसील कार्यालयात हदगाव नगर परिषद व हिमायतनगर नगरपंचायतीचे 42 मतदार मतदानाचा हक्क बजावतील. भोकर तहसील कार्यालयात भोकर व मुदखेड नगर परिषदांतील 48 मतदारांसाठी मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे.

नांदेड तहसील कार्यालय हे सर्वाधिक मतदारांचे केंद्र ठरणार असून येथे अर्धापूर नगरपंचायत आणि नांदेड-वाघाळा महानगरपालिकेतील एकूण 108 मतदार मतदान करणार आहेत. कंधार तहसील कार्यालयात कंधार व लोहा नगर परिषदांचे 46 मतदार, तर धर्माबाद तहसील कार्यालयात धर्माबाद व उमरी नगर परिषदांचे 48 मतदार मतदान करतील.

बिलोली तहसील कार्यालयात नायगाव नगरपंचायत, बिलोली व कुंडलवाडी नगर परिषदांतील एकूण 65 मतदारांसाठी मतदान केंद्र राहणार आहे. देगलूर तहसील कार्यालयात देगलूर व मुखेड नगर परिषदांतील 54 मतदार मतदान प्रक्रियेत सहभागी होतील.

नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील ही निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींसाठी महत्त्वाची मानली जात असून जिल्ह्यातील सर्व 452 मतदार मतदान प्रक्रियेत सहभागी होणार आहेत. निवडणूक यंत्रणेने मतदानाची तयारी पूर्ण केली असून मतदान प्रक्रिया शांततेत व पारदर्शक वातावरणात पार पडण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

452 मतदारांची यादी..

MLC Election 2026 अंतिम मतदार Marathi


Post Views: 147






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *