सुभाष चांडक यांच्यासह पदाधिकाऱ्यांचा विशेष गौरव:30 वर्षांत 2091 मोफत हृदय शस्त्रक्रिया; लायन्सकडून काैतूक‎

0
240_17795259406a11693416cc0_22rotarclub.jpg




३० वर्षांत २०९१ मोफत हृदय शस्त्रक्रियेसह अन्य उपक्रमकासाठी लॉ. सुभाष चांडक यांच्यासह पदाधिकाऱ्यांचा लायन्स इंटरनॅशनलकडून गौरव करण्यात आला. पुणे येथे पार पडलेल्या लायन्स इंटर नॅशनलच्या बहुप्रांतिय जिल्हा ३२३४ च्या नवव्या अधिवेशनात अकोल्याचे समाजसेवक तथा लायन्स क्लब ऑफ अकोला मिडटाउनचे संस्थापक अध्यक्ष सुभाष चांडक यांना बहुप्रांतिय अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. १६ व १७ मे रोजी झालेल्या या अधिवेशनात राज्यातील विविध भागांतील ४०४ क्लबचे प्रतिनिधी आणि सुमारे ६०० पदाधिकारी सहभागी झाले होते. सुभाष चांडक यांनी गेल्या ३० वर्षांत तब्बल २०९१ गरजू रुग्णांच्या मोफत हृदय शस्त्रक्रियेसाठी पुढाकार घेतला. त्यांच्या या कार्याची दखल घेत मल्टिपल कौन्सिल चेअरपर्सन विजय सारडा यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. तसेच त्यांनी ५० देशांमध्ये जाऊन लायन्स इंटर नॅशनलच्या विविध बैठका आणि सेवा उपक्रमांमध्ये सहभाग घेतल्याबद्दलही उपस्थित मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाला प्रवीण छाजेड, नरेंद्र भंडारी, रीना छाजेड, राजेंद्र मुच्छाल, अश्विनकुमार बाजोरिया यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यापूर्वीही सुभाष चांडक यांना महाराष्ट्र शासन, भारतीय रेड क्रॉस सोसायटी तसेच विविध सामाजिक संस्थांकडून अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed