पुण्यात मेफेड्रोन विक्री प्रकरणी एकाला अटक:1.76 लाखांचा मुद्देमाल जप्त, साथीदारांचा शोध सुरू

0
7ce38912-4c69-454a-935e-7a733801034c_1779627951535.jpg




पुण्यात गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने मेफेड्रोन विक्री प्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे. शंकरशेठ रस्ता परिसरातून ही कारवाई करण्यात आली असून, आरोपीकडून १ लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कानिफनाथ उर्फ कानू विष्णू नायडू (वय ५१, रा. काशेवाडी, भवानी पेठ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून मोटार, मोबाइल आणि १ लाख ४५ हजार ८०० रुपये किमतीचे मेफेड्रोन असा एकूण १ लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अमली पदार्थ विरोधी पथकाचे कर्मचारी शंकरशेठ रस्ता परिसरात गस्त घालत असताना, उड्डाणपुलाजवळ आरोपी नायडू मोटारीतून विक्रीसाठी आला होता. पोलिसांनी सापळा रचून त्याला पकडले. या प्रकरणी त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नायडूला त्याच्या साथीदारांनी मेफेड्रोन विक्रीसाठी दिले होते. नायडूविरुद्ध खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. सदनिकेतून पाच लाखांचा ऐवज लांबविला मुंढवा भागात एका सोसायटीत असलेल्या सदनिकेतून चोरट्यांनी रोकड, तसेच सोन्याचे दागिने असा पाच लाख १५ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणाने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण कुटुंबीयांसह मुंढव्यातील बॉन विवांत सोसायटीत राहायला आहेत. सदनिकेचा दरवाजा उघडा असल्याची संधी चोरट्याने साधली. बेडरूम मधील कपाटातून चोरट्याने पाच हजारांची रोकड, तसेच सोन्याचे दागिने असा पाच लाख १५ हजार रुपयांचा ऐवज लांबविला. सदनिकेत चोरी करणारा चोरटा माहितगार असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलीस उपनिरीक्षक युवराज पोमण तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed