दिनांक 1सप्टेंबर 2026 रोजी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालया समोर मराठी चित्रपट सृष्टी बचाव आंदोलन करण्यात येणार आहे.अशी माहिती सिने अभिनेते भूषण जोशी यांनी दिली. मराठी चित्रपट सृष्टी बंद होण्याच्या मार्गावर असून ती बंद होऊ नये व आपल्या चित्रपटसृष्टीतील प्रमुख मागण्या मान्य करण्यासाठी चे निवेदन माननीय जिल्हाधिकारी नांदेड यांना देण्यासाठी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे.त्यासाठी चित्रपटसृष्टीतील व्यक्तींनी व नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक कलाकारांनी दिनांक 1 सप्टेंबर 2026 मंगळवार रोजी ठीक सकाळी 10:30 किंवा 10:45 वाजेपर्यंत जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहवे.असे आव्हान सिने अभिनेते भूषण जोशी यांनी केले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version