5जी लाँचच्या आधीच स्वदेशी 6जीची तयारी

Read Time:2 Minute, 21 Second

नवी दिल्ली : 5जी नेटवर्क लवकरच भारतात रोलआऊट होणार आहे. जीओ, एअरटेल, व्हिआय या तिन्ही कंपन्या आता 5जीच्या तयारीत व्यस्त आहेत. टेलीकॉम मंत्र्यांच्या मते ऑक्टोबरपर्यंत भारतात 5जी सर्विस उपलब्ध होणार आहे.

राज्यमंत्री देवुसिंह चौहान यांनी याबाबतची माहिती दिली आहे. मात्र आता 5जी नेटवर्कच्या लाँचिंग पार्श्वभूमीवरच 6जी सर्विसेस डेव्हलप करण्यास सुरूवात झाली असल्याचे कळते आहे.

इंटरनॅशनल टेलीकम्युनिकेशन यूनियन रिजनल स्टॅँडर्डायजेशन फर्मच्या एका उद्घाटन समारंभात पोहोचले असाताना त्यांनी या वर्षाच्या शेवटपर्यंत 5जी सर्विस सुरू होणार असल्याचे सांगितले.

6जी च्या तयारीला सुरूवात
जवळपास एका महिन्यात 5जी मोबाईल सर्विसेस देशात रोलआऊट होणार ज्यामुळे प्रत्येक क्षेत्रातील विकास वाढणार आहे. 6जी टेक्नॉलॉजी इनोवेशन ग्रुपने देखील सेटअप केलाय, जो 6जी डेवलप करण्याचे काम करेल. शासन स्वदेशी डिझाईन, डेव्हलपमेंट आणि मॅन्युफॅक्चरींगला प्रोत्साहन देत आहे. तसेच देशात संपूर्णत: 5जी टेस्ट बेड विकसित केला आहे. ज्यामुळे 5जी एलिमेंटच्या टेस्टिंगला मदत होईल.

लवकरच 5जी रोलआऊट
यावर्षी वर्षाच्या शेवटपर्यंत देशात विकसित आणि मॅन्युफॅक्चर झालेले 5जी स्टॅक्स बघायला मिळू शकते. अलीकडेच 5जी स्पेक्ट्रमच्या लिलावाची प्रक्रिया सुरू झाली आहे. दूरसंचार विभागाच्या मते 4जी च्या तुलनेत 5जी सर्विसेसची गती १० पटीने जास्त असणार आहे. यामध्ये कटेंट लवकर डाऊनलोड होणार, तसेच कॉलिटी पण चांगली असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

7 + 7 =