315 पोलीस अंमलदारांचे शुक्रवारी सकाळी 7 वाजल्यापासून पोलीस अधिक्षक कार्यालयात समुपदेशन होणार


नांदेड(प्रतिनिधी)-उद्या सकाळी 7 वाजल्यापासून सर्वसाधारण बदल्या 2024 साठी पोलीस उपअधिक्षक डॉ.अश्विनी जगताप यांनी जिल्ह्यातील 315 पोलीस अंमलदारांना समुपदेशनासाठी बोलावले आहे.

सन 2024 च्या सर्वसाधारण बदल्या कधी होतील या संदर्भाने राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी, कनिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी सर्वच चिंतेत आहेत. पण नांदेडच्या पोलीस अधिक्षकांच्या मान्यतेनंतर गृह विभागाच्या पोलीस उपअधिक्षक डॉ. अश्विनी जगताप यांनी दि.13 जून रोजी जारी केलेल्या बिनतारी संदेश क्रमांक 1194 नुसार जिल्ह्यातील 315 पोलीस अंमलदारांना उद्या दि.14 जून रोजी सकाळी 7 वाजता पोलीस अधिक्षक कार्यालयातील मंथन सभागृहात हजर राहण्यास सांगितले आहे. जे पोलीस अंमलदार समुपदेशनासाठी हजर राहणार नाहीत त्यांची प्रशासकीय सोयीनुसार बदली करण्यात येईल.नांदेड जिल्ह्यातील पोलीस अंमलदारांसाठी पोलीस अधिक्षक कार्यालयातून समुपदेशनासाठी जाहीर करण्यात आलेल्या 315 पोलीस अंमलदारांची पीडीएफ संचिका बातमी सोबत जोडली आहे. वास्तव न्युज लाईव्ह सुध्दा सर्व पोलीस अंमलदारांना सांगू इच्छीते की, दिलेल्या वेळेत हजर राहा नसता तुमची बदली होणार नाही.


Post Views: 180






Share this article:
Previous Post: नांदेड जिल्ह्यातील 9 पोलीस अंमलदार आता झाले श्रेणी पोलीस उपनिरिक्षक

June 13, 2024 - In Uncategorized

Next Post: सिडको येथील इनरिच स्कुलमध्ये विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत

June 13, 2024 - In Uncategorized

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.