
एक रात्र माझ्यासोबत घालव!; अंकिता लोखंडेचा निर्मात्याबाबत धक्कादायक खुलासा
मुंबई | अंकिता लोखंडेची एक मुलाखत सध्या खूप चर्चेत आहे. या मुलाखतीत अंकिताने पर्सनल लाईफबद्दलचे अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. सुशांत सिंग राजपूतसोबतचे ब्रेकअप, रिजेक्शन, डिप्रेशन यावर ती बोलली. शिवाय कास्टिंग काऊचबद्दलही तिने धक्कादायक खुलासा केला.
‘बॉलिवूड बबल’ला दिलेल्या मुलाखतीत अंकिताने कास्टिंग काऊचचा एक शॉकिंग अनुभव शेअर केला. तिने सांगितले, खूप वर्षाआधी मी केवळ 19-20 वर्षांची असताना मला एका साऊथ सिनेमासाठी बोलवण्यात आले होते. त्या माणसाने मला त्याच्या खोलीत बोलवले. आम्ही तुला काही विचाारू इच्छितो, असे तो म्हणाला. यावर विचारा, असे मी म्हणाली. यावर तुला कॉम्प्रमाइज करावे लागले, असे तो म्हणाला.
त्या खोलीत मी एकटे होते. त्यामुळे मी थोडा स्मार्टनेस दाखवला. ठीक आहे कशाप्रकारचे कॉम्प्रमाइज करावे लागेल सांगा? तुमच्या निर्मात्याला काय हवं ते सांगा? असे मी न घाबरता त्याला विचारले. यावर, तुला निर्मात्यासोबत एक रात्र घालवावी लागेल, असे तो म्हणाला आणि मी त्याचा बँड वाजवला. तुम्हाला एक टॅलेंटेड अभिनेत्री नको तर निर्मात्यासोबत झोपणारी मुलगी हवी आहे, असे त्याला सुनावत मी तेथून बाहेर पडले. त्या घटनेने मी भांबावले होती. मी कोणत्या इंडस्ट्रीत आले? असा प्रश्न मी स्वत:ला विचारत होती.
दरम्यान, कास्टिंग काऊचची अशीच आणखी एक घटनाही तिने सांगितले. तिने सांगितले, मी एका मोठ्या अभिनेत्याला भेटले होते. त्याचे नाव सांगणार नाही. त्याच्याशी हात मिळवला आणि मी लगेच मी माझा हात मागे खेचला होता. कारण त्याच्याकडून आलेले वाईब्स मी अनुभवले होते आणि ते चांगले नव्हते. त्या अभिनेत्याला सगळेच ओळखतात. या घटनेचाही मला मोठा शॉक बसला होता.