
स्वयंचलित हवामान यंत्राद्वारे आर्द्रता, तापमान, हवेचा वेग मोजला जातो.
निघोज येथील तरुण शेतकरी राहुल अमृता रसाळ यांनी बांधावरच प्रयोगशाळा अन् स्वयंचलित हवामान केंद्र उभारले. जैविक खताची शेतातच निर्मिती करत केली व त्यावरील वर्षभराचा दीड लाख व रासायनिक खतावरील खर्चात १० लाखांची बचत केली. द्राक्षे व डाळिंबाची युरोपात निर्य
.
दरवर्षी एक हजार टन कंपोस्ट खताची निर्मिती पिकांना जास्त सेंद्रिय खते देण्यासाठी राहुल हे दरवर्षी एक हजार टन कंपोस्ट खताची निर्मिती करतात. यासाठी ते २०० टन शेणखत, ४०० टन साखर कारखान्यातील बगॅस, ३०० टन उसाची मळी, १०० टन पोल्ट्री खत याचे मिश्रण करतात. दरवर्षी जूनच्या सुरुवातीला हे मिश्रण तयार करून तसेच ठेवले जाते. डिसेंबरअखेर हे मिश्रण वापरण्यायोग्य होते.
फवारणीसाठी उभारला आरओ प्रकल्प शेतात स्वयंचलित हवामान केंद्रासह पाण्यातील क्षार मोजण्यासाठी इसीमीटर, माती व पाण्यातील पीएच मोजण्यासाठी पीएच मीटर, पाणी व मातीतील अॉक्सिजन मोजण्यासाठी डिसाॅल्ट ऑक्सिमीटर, पिकांना फवारणी करण्यासाठी लागणाऱ्या पाण्यासाठी आरओ प्रकल्प आहे.
हवा-पाण्याचा अभ्यास करून नियोजन
स्वयंचलित हवामान केंद्राद्वारे पाऊस, हवेतील आर्द्रता, तापमान, हवेचा वेग, सूर्यप्रकाश या प्रत्येकाचा अभ्यास केला जातो. उदा. समजा पेरणीनंतर सलग ७२ तास आर्द्रता ५० टक्क्यांपेक्षा अधिक असेल तर पिकांवर बुरशीजन्य आजाराचा धोका असतो. अशा वेळी आधीच बुरशीनाशकाचा वापर करून पिकांची वाढ कायम राहील हे पाहिले जाते. याद्वारे शेतातील पाऊसही मोजला जातो. त्याद्वारे पिकांना आवश्यक ते पाणी दिले जाते.
या प्रगतिशील शेतकऱ्याकडून जाणून घ्या अधिक माहिती 9766550624

आपणही शेतकरी आहात. अनोख्या प्रयोगांची संपूर्ण माहिती, छायाचित्र-व्हिडिओ आपल्या नाव व पत्त्यासह 8888840081 या व्हॉट्सअॅपवर पाठवावी. मात्र ही माहिती यापूर्वी वृत्तपत्रात, सोशल मीडियावरही प्रसिद्ध झालेली नसावी.