आमदार गायकवाड यांची कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण: सभागृहात विरोधकांकडून प्रश्नचिन्ह, कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश – Mumbai News

आमदार निवासमधील कॅन्टीन कर्मचाऱ्याने निकृष्ट दर्जाचे जेवण दिल्यामुळे शिवसेना शिडणे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी थेट कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केली. आमदारांना अशा पद्धतीने जेवण देत असेल तर सर्वसामान्य नागरिकांना कशा पद्धतीने जेवण मिळत असेल? असा प्

.

विधानपरिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, आमदार निवासात काही घाण असेल किंवा चुकीच्या काही गोष्टी असतील तर स्वतंत्रपणे त्यावर कारवाई करावी. पण लोकप्रतिनिधींनी मारहाण करणे हे चुकीचे आहे. त्यांनी जे केले ते चुकीचेच आहे. यामुळे आमदारांबद्दल लोकांमध्ये चुकीचा संदेश जातो. आपण कुठेतरी सत्तेचा गैरवापर करतो, अशा प्रकारची भावना लोकांमध्ये जाते. निश्चितपणे ही गंभीर बाब आहे आणि यावर जी काही कारवाई करायची असेल ती करण्यात यावी.

काय म्हणाले संजय गायकवाड?

प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय गायकवाड यांनी सांगितले की, रात्री दहा वाजता माझी जेवणाची वेळ असते. त्यामुळे काल रात्री मी नऊ-साडेनऊ वाजता वरण भात आणि पोळी याची ऑर्डर दिली होती. त्यात भातासोबत वरण मिक्स करुन मी पहिला घास घेताच मला खराब वाटला. मला वाटले वरणामध्ये चिंच असेल, म्हणून मी पोळी सोबत दुसरा घास घेतला असता मला वोमिटिंग झाली. त्यामुळे मी वरण चेक केले असता ते पूर्णपणे सडलेले होते.

पुढे बोलताना संजय गायकवाड म्हणाले, आमदारांच्या जिवाशी खेळू नका. कॅन्टिन मालकाकडून अनेकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. तिथे मिळणाऱ्या निकृष्ट जेवणासंबंधी मी यापूर्वीही तक्रार केली होती. दिवसभरात 10 हजार जण या कॅन्टिनमध्ये जेवतात. रात्री समितीच्या चेअरमनलाही हे सांगितले होते. मी जे केले ते मला मान्य आहे. मला त्याचा कोणताही पश्चाताप नाही.

  • Related Posts

    Former Sarpanch of Shirasgaon murdered over land dispute along with atrocities | अॅट्रॉसिटीसह जमिनीच्या वादातूनच शिरसगावच्या माजी सरपंचाची हत्या: आरोपी समीर आणि इरफान यांना श्रीरामपूर येथून अटक – Chhatrapati Sambhajinagar News

    प्रतिनिधी | छत्रपती संभाजीनगर/ कन्नड . गावातील तीन जणांशी वेगवेगळ्या कारणांवरून झालेल्या वादातून माजी सरपंच राजाराम ऊर्फ राजू भावसिंग चुंगडे (४७) यांची हत्या झाल्याचे निष्पन्न झाले आहे. रविवारी सकाळी ग्रामीण…

    On-farm laboratory and weather station for organic fertilizers | जैविक खतांसाठी शेतातच प्रयोगशाळा अन् हवामान केंद्र: 65 एकर कोरडवाहूपैकी 40 एकर शेती बनवली बागायती – Ahmednagar News

    स्वयंचलित हवामान यंत्राद्वारे आर्द्रता, तापमान, हवेचा वेग मोजला जातो. निघोज येथील तरुण शेतकरी राहुल अमृता रसाळ यांनी बांधावरच प्रयोगशाळा अन् स्वयंचलित हवामान केंद्र उभारले. जैविक खताची शेतातच निर्मिती करत केली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *