Advertisement

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या हिंगोलीत: ७५० कोटी रुपयांच्या विकासकामांचे करणार भूमिपूजन अन् उद्घाटन – Hingoli News

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या गुरुवारी हिंगोली येथील पंचायत समिती इमारतीच्या उद्घाटनासह सुमारे ७५० कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन व उद्घाटन होणार आहे. यावेळी ते एका शेतकरी व महिला मेळाव्यालाही संबोधीत करणार आहेत.

.

येथील रामलिला मैदानावर आयोजित कार्यक्रमास मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह पालकमंत्री नरहरी झिरवाळ, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, जयकुमार गोरे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष गजानन घुगे, आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार राजेश नवघरे, आमदार संतोष बांगर, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अंजली रमेश, पालिका मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांच्यासह लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

यावेळी हिंगोली पंचायत समितीच्या इमारतीचे उदघाटन होणार आहे. त्यानंतर हिंगोली शहरातील वाढीव नळ योजनेच्या बांधकामाचे भुमीपूजन केले जाणार आहे. शहरातील नवीन वसाहतींना पाणी पुरवठा करण्यासाठी आमदार मुटकुळे यांनी शासनाकडे पाठपुरावा करून वाढीव पाणी पुरवठा योजनेला मंजुरी मिळविली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत या नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामाला सुरवात होणार असून शहरातील नवीन वासाहतीचा पाणी प्रश्‍न मार्गी लागणार आहे. या शिवाय हिंगोलीत नव्याने मंजूर झालेल्या वैद्यकिय महाविद्यालयाच्या इमारतीचे भुमीपूजन केले जाणार आहे.

यावेळी शेतकरी मेळावा व महिला मेळावा होणार असून या मेळाव्यास मुख्यमंत्री फडणवीस मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार तान्हाजी मुटकुळे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष गजानन घुगे, माजी आमदार रामराव वडकुते यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

दरम्यान, हिंगोली पंचायत समितीच्या नुतन इमारतीच्या उदघाटनामुळे पुढील काही दिवसांतच पंचायत समितीचे कामकाज नवीन इमारतीमधून होणार आहे. त्यामुळे मागील १५ ते २० वर्षापासून गळक्या इमारतीमधून कर्मचाऱ्यांची सुटका होणार असल्याने कर्मचाऱ्यांतून समाधान व्यक्त केल जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
Join NandedLive
Hello
Can we help you?
avatar
Radio24