नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडच्या विशेष सुरक्षा विभागातील पोलीस निरिक्षक केंद्रे आणि पोलीस अंमलदार भारती यांनी अनुक्रमे 2 कास्य पदक आणि 2 रजत पदक मिळवून नांदेड जिल्हा पोलीस आणि विशेष सुरक्षा विभागाचे नाव राज्यात गाजविले आहे.
पुणे येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 1 येथे 20 आणि 21 फेबु्रवारी रोजी महाराष्ट्र पोलीस शुटींग स्पर्धा 2025 आयोजित करण्यात आली होती. यामध्ये नांदेड जिल्ह्याच्यावतीने विशेष सुरक्षा विभागातील पोलीस निरिक्षक संतोष केंद्रे आणि पोलीस अंमलदार शंकर भारती बकल नंबर 3191 यांनी सहभाग घेतला होता. संतोष केंद्रे यांनी ग्लॉक पिस्टल या स्पर्धेत दोन कास्य पदक पटकावले आहेत. तसेच पोलीस अंमलदार शंकर भारती यांनी याच ग्लॉक पिस्टल प्रकरात दोन रजत पदके मिळवली आहेत.
नानविज, दौंड येथील पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य रामचंद्र केंडे, पोलीस बल गट क्रमांक 1 पुणे येथील सहाय्यक समादेशक भानुदास पवार आणि फोर्स-1 पुणे येथील पोलीस उपअधिक्षक संतोष गायके यांनी विशेष सुरक्षा विभागातील पोलीस निरिक्षक संतोष केंद्रे आणि पोलीस अंमलदार शंकर भारती यांना पदके प्रदान करून शुभकामना प्रेषित केल्या आहेत.
विशेष सुरक्षा विभागाचे विशेष पोलीस महानिरिक्षक अंकुश शिंदे, नांदेड पोलीस परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप, विशेष सुरक्षा विभागाचे पोलीस अधिक्षक निलेश मोरे, नांदेडचे पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक सुरज गुरव, डॉ.खंडेराय धरणे, सहाय्यक पोलीस अधिक्षक शफाकत आमना, कृतिका, पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक, संकेत गोसावी, डॉ.अश्र्विनी जगताप यांच्यासह राखीव पोलीस निरिक्षक विजय धोंडगे, सर्व पोलीस निरिक्षक, अनेक अधिकारी, अनेक पोलीस अंमलदार यांनी पोलीस निरिक्षक संतोष केंद्रे आणि पोलीस अंमलदार शंकर भारती यांचे कौतुक करून पुढच्या स्पर्धांसाठी शुभकामना प्रेषित केल्या आहेत. शंकर भारती यांनी पोलीस शुटींग स्पर्धेत एकदा सहा सुवर्ण पदक पटकावले होते.
Post Views: 209
Leave a Reply