नांदेड(प्रतिनिधी)-स्वागत लॉन्स, सांगवी येथे लग्न समारंभासाठी तयार करून ठेवलेले दागिणे व 6 लाख 16 हजार रुपयांचा ऐवज चोरी झाल्याचा प्रकार 12 फेबु्रवारीच्या रात्री 9.30 वाजता घडला आहे.
ओमकार अनिरुध्द पांडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.12 फेबु्रवारी रोजी स्वागत लॉन्समध्ये त्यांच्या बहिणीचे लग्न होते. लग्नाकरीता तयार करून ठेवलेले सोन्याचे 7 तोळे व 1 ग्रॅम वजनाचे दागिणे, रोख रक्कम दीड लाख रुपये आणि दोन मोबाईल असा एकूण 6 लाख 16 हजार रुपयांचा ऐवज तेथे उपस्थितांची नजर चुकवून चोरट्यांनी चोरून नेला आहे. विमानतळ पोलीसांनी या घटनेसंदर्भाने गुन्हा क्रमांक 49/2025 दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरिक्षक जोंधळे अधिक तपास करीत आहेत.
Post Views: 166
Leave a Reply