नांदेड – राज्याचे उद्योग, मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
शुक्रवार 14 फेब्रुवारी 2025 रोजी मुंबईहून विमानाने सकाळी 8.30 वा. श्री गुरु गोविंद सिंगजी विमानतळ येथे आगमन मोटारीने शासकीय विश्रामगृह नांदेड कडे प्रयाण. सकाळी 8.45 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. सकाळी 9.15 वा नांदेड जिल्हा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व उद्योग विभाग आढावा बैठक. स्थळ- उद्योग भवन, शिवाजीनगर नांदेड . सकाळी 10 वा. पत्रकार परिषद स्थळ- उद्योग भवन, नांदेड . सकाळी 10.30 वा. उद्योग भवन, शिवाजीनगर नांदेड येथून मोटारीने नांदेड विमानतळाकडे प्रयाण. सकाळी 10.45 वा. श्री गुरु गोविंदसिंगजी विमानतळ नांदेड येथून हेलिकॉप्टरने परभणीकडे प्रयाण करतील. दुपारी 1.30 वाजता श्री गुरु गोविंदसिंगजी विमानतळ नांदेड येथे आगमन व विमानाने पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणेकडे प्रयाण करतील.
Post Views: 92
Leave a Reply