नांदेड- संत शिरोमणी रविदास महाराजांनी समाजातील जाती व्यवस्थेला विरोध करून प्रत्येक जातीतील लोकांना न्याय मिळावा यासाठी त्यांनी समाज प्रबोधन करून जनजागृती कार्य केले. त्यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन जिल्हा अभिवक्ता संघाचे अध्यक्ष अॅड. आशिष गोधमगावकर यांनी केले.
ते संत शिरोमणी रविदास महाराज यांची 648 वी जयंती नांदेड जिल्हा अभिव्यक्त संघ नांदेड व संत शिरोमणी रविदासजी महाराज जयंती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१२ फेब्रुवारी रोजी नांदेड जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात आयोजित संत शिरोमणी रविदास जयंती कार्यक्रमात बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड.बि.आर. भोसले हे होते तर प्रमुख वक्ते म्हणून अभिव्यक्ता संघाचे अध्यक्ष, अॅड आशिष गोधमगांवकर, एडवोकेट विजय गोणारकर, जयंती समितीचे प्रमुख अॅड.सिद्धेश्वर खरात आणि अभिव्यक्ता संघाचे सचिव अॅड. अमोल वाघ व उपाध्यक्ष अॅड.संजय पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
जयंती सोहळ्यास संघाचे कोषाध्यक्ष अॅड.मारोतीराव बादलगांवकर,अॅड.संजय खंडेलवाल, अॅड.डि.के.हांडे, अॅड.शिवराज कोळीकर,अॅड.लक्ष्मणराव पुयड, अॅड.अनिल पाटील, अॅड.कुंभेकर,अॅड.उमेश मेगदे, अॅड.रवि पाटील व अॅड.जीवन चव्हाण आणि ईतर जेष्ठ विधीज्ञांची उपस्थिती होती.
Post Views: 4
Leave a Reply