नांदेड(प्रतिनिधी)-तामसा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका अल्पवयीन बालिकेला पाण्यामध्ये गुंगीचे औषध देवून एकदा अत्याचार आणि त्यानंतर अत्याचाराची परिसिमा गाठत शाळेच्या मुख्याध्यापकाने त्या बालिकेला गर्भवती केले.
तामसा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी एक अल्पवयीन बालिका खाजगी शाळेत शिक्षण घेत होती. इतर विषयांपेक्षा इंग्रजी विषयामध्ये तिची कमतरता होती. तिच्या कमतरतेला घाणेरड्या मुख्याध्यापकाने हेरले. तिच्या पालकांना खोटे फसवले आणि सांगितले की, ही मुलगी खुप हुशार आहे. बाकीचे ठिक आहे. परंतू इंग्रजी विषयात कमजोर आहे आणि ती पुर्तता मी करून देईल. त्यामुळे पालकांनी आपले मुलीचे भले पाहणाऱ्या मुख्याध्यापकावर विश्र्वास ठेवला. तो सांगिल तेंव्हा, तो सांगिल तेथे मुलीला पाठवत गेले आणि इथेच पालकांची चुक झाली. त्या खाजगी शाळेतील मुख्याध्यापक राजुसिंह चव्हाण याने नांदेडला पोलीस प्रशिक्षण केंद्र दाखवतो असे सांगून त्या बालिकेला आपल्यासोबत चार चाकी वाहनात तेथून नांदेडला आणले. नांदेडमध्ये त्या अल्पवयीन बालिकेसोबत काय केले हे लिहुन आमची लेखणी आम्ही घासून घेेवू इच्छीत नाही. कारण वाचकांना ते सर्व कळते. केलेल्या घटनेचा व्हिडीओ रेकॉर्डींग मुख्याध्यापकाने केला आणि सांगितले की, मी काय केले हे जगाला सांगितले तर हा व्हिडीओ व्हायरल करेल आणि हे सांगून त्या अल्पवयीन बालिकेवर अनेकदा अत्याचार केला. त्यातून ती गर्भवती झाली. आपल्या बालका-बालिकांमधील बदल पालक आपोआप ओळखतात आणि तसेच झाले. पालकांनी बालिकेला सविस्तर विचारल्यावर त्या बालिकेने ही सर्व माहिती सांगितली. त्यानंतर पोलीस ठाणे तामसा येथे तक्रार देण्यात आली आणि खाजगी शाळेचा मुख्याध्यापक राजूसिंह चव्हाण विरुध्द पोक्सो कायद्याच्या कलमांसह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खात्रीलायक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अत्याचार मुख्याध्यापक राजूसिंह चव्हाण सध्या फरार आहे.
घडलेल्या घटनेतून पालकांनी आपल्या पाल्यांबद्दल अत्यंत खात्रीलायक माहिती नेहमी बाळगली पाहिजे यावर सर्वच पालकांनी लक्ष ठेवण्याची गरज आहे.
Post Views: 159
Leave a Reply