Advertisement

तीन-चार लाख कोटीची फालतू विमाने खरेदी करण्याचा करार करण्यासाठीच नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौरा

सर्वसामान्य माणसासाठी हातात हतकड्या आणि पायात बेड्या पण गौतम अदानीसाठी कायदाच निलंबित केला. हा प्रकार म्हणजे आपण पतंग उडवतांना दुसऱ्याचे पतंग कापण्याच्या पध्दतीप्रमाणे कधी आपला दोरा ओढून त्याची पतंग कापली जाते तर कधी आपल्या हातातील दोऱ्याला ढिल देवून त्याची पतंग कापतो असेच काही अमेरिकेचे राष्ट्र अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांनी केला आहे. मोदी आजपासून अमेरिकेत आहेत. 3 ते 4 लाख कोटी रुपयांची बेमानी झालेली विमाने भारताला विकली जातील आणि तो पैसा भारतीय जनता कराच्या माध्यमातून भरत राहिल. हे सत्य आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिकन दौऱ्याचे.
हा मुद्या समजून घेण्यासाठी तीन तारखा लक्षात घ्या. 20 जानेवारी 2025 चा डोनॉल्ड ट्रम्पचा शपथविधी, 5 फेबु्रवारी 2025 भारतीय प्रवाशांची परत पाठवणी आणि 10 फेबु्रवारी 2025 अमेरिकेतील 1975 चा प्रिव्हेंशन ऑफ फॉरेन करप्शन ऍक्ट निलंबित करणे. हा कायदा सहा महिन्यासाठी निलंबित करण्यात आला आहे. 20 जानेवारी 2025 रोजी राष्ट्र अध्यक्ष पदाची शपथ घेतांना भारताच्या अतिरेकी गुरू बसवंतसिंघ पन्नू याला निमंत्रण देण्यात आले होते. एवढ्या सुरक्षेत कॅमेऱ्याने त्यावर फोक्स केला तेंव्हा तो खालिस्थान जिंदाबादच्या घोषणा देत होता. ही भारतीयांची नाचक्की नव्हे तर काय? भारतीय पंतप्रधानांना मात्र निमंत्रण नव्हते. दुसरी तारीख 5 फेबु्रवारी 2025 ज्या दिवशी ज्या दिवशी भारतीय प्रवाशांना छोट्या-छोट्या प्रवाशी कागदपत्रांच्या कमतरतेमुळे सैन्याच्या विमानात हातकड्या आणि बेड्या टाकून परत पावले. 10 फेबु्रवारी 2025 रोजी अमेरिकन कॉंगे्रसचे सहा खासदार तेथील महाअभियोक्त्यांना पत्र देतात की, अदानीला चुकीने फसवले आहे. त्यामुळे भारत अमेरिका संबंध खराब होत आहेत. याची चौकशी व्हावी आणि त्याच दिवशी डोनॉल्ड ट्रम्प एफसीपीए या कायद्याला सहा महिन्यासाठी निलंबित करतात. अर्थात पन्नूला सुरक्षा मिळते, रोजगार आणि भविष्य शोधणाऱ्या भारतीयांना परत पाठविले जाते तर अदानीला वाचविण्यासाठी कायदाच निलंबित केला. काय तर्क यातून लावता येईल तो तर्क भारताची बेअब्रु करण्यापेक्षा दुसरा असूच शकत नाही. काही तरी डिल भारतात आणि अमेरिकेत झाली असणार त्यामुळेच हा कायदा निलंबित करण्यात आला. सध्या भारतात एअर इंडिया 2025 सुरू आहे. यात जगभरातील फायटर प्लेन पासून अनेक विमाने आली आहेत. त्यात अमेरिकेची पण आहेत. या डिलप्रमाणे अमेरिका भारतासोबत मोदींच्या उपस्थितीत तीन ते 4 लाख कोटी रुपयांचे निकामी झालेले विमान विक्री करेल आणि भारत आम्ही काय भारी विमान खरेदी केले असा प्रचार करेल. परंतू त्या विमानांचे पैसे भारताच्या सर्वसामान्य नागरीकांच्या खिशातून कराच्या रुपाने दिले जातील हे आहे सत्य या दौऱ्याचे. भारताच्या पंतप्रधानांना सर्वसामान्य माणसाशी काही प्रेम नाही. त्यांना फक्त श्रीमंत, भांडवलदार, कारखानदार यांच्यावरच प्रेम आहे. याही पेक्षा भारी तर्क असा आहे की, मणीपुरचे मुख्यमंत्री बिरेनसिंह यांचा राजीनामा घेण्यात आला. अमेरिकेत जाऊन मोदी सांगतील मणीपुरमध्ये त्याच्या मुख्यमंत्री कार्याकाळात अनेक चर्च जाळण्यात आले आहेत आणि त्यामुळेच मी त्याचा राजीनामा घेतला. अर्थात देशाच्या जनतेला भ्रमात ठेवून आपली स्वतची प्रतिमा उज्वल दाखवत असतांना देशाला महत्व नाही.


विघटनवादी चळवळ चालविणारा पन्नू अमेरिकेत बसून सुत्र हलवतो आणि आमचे सुरक्षा सल्लागार अजित डोबाल यांना तेथे फसवले जाते. भारतापासून वेगळे होण्याची भुमिका चालविणाऱ्या पन्नूला अमेरिका सुरक्षा देते आणि आपल्या आई-बहिणीचे सोने विकून, आपले घरदार, शेत जमीन विकून भविष्य शोधण्यासाठी गेलेल्या लोकांसोबत अतिरेक्यांसारखा व्यवहार अमेरिका करते. तेथे खलीस्थान जिंदाबाद या घोषणा दिल्यानंतर सुध्दा पन्नूवर काही कार्यवाही अमेरिका सरकारने केली नाही. हा प्रकार म्हणजे भारताला खाली पाहावे लागेल असाच आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अमेरिकेला जात आहेत हे निमंत्रण नाही तर स्वत:च कॉल करून मला येवू द्या ना म्हणण्याचा प्रकार आहे. त्यावर तर्क केला तर डोनॉल्ड ट्रम्प यांनी मोदी इज कमिंग असे शब्द वापरलेले आहेत.

ज्यांना इंग्रजी छान कळते ते याचा अर्थ लावतील. पण इंग्रजीचा ब्र माहित नसणारे मोदीला आलेले निमंत्रणच म्हणतील. असो प्रत्येकाची आप-आपली बुध्दी आहे. भारतातील माजी पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांना शिष्टाचार (प्रोटोकॉल) वगळून विमानात जाऊन त्यांचे स्वागत केल्याचा अभिलेख आहे. आर्यन लेडी इंदिरा गांधी यांनी अमेरिकन राष्ट्र अध्यक्षांचा फोन सुध्दा स्विकारलेला नव्हता. अशा परिस्थितीत आज पंतप्रधान अमेरिकेला जाऊन काय करणार आहेत. शेवटी भारताचा अपमानच.
एफसीपीए कायदा सहा महिन्यासाठी रद्द करण्यात आला हे खरे आहे. भारताच्या अर्थसंकल्पात अमेरिकेची दुचाकी नामे आले डेविडसन यावर आयात कर घटवला. अमेरिका तुमच्या लोखंड उत्पादनावर आयात कर वाढवत आहे. अदानीला सहा महिन्याची मुदत देण्यात आली आहे. पुन्हा त्याला सहा महिन्यानंतर झटका सुध्दा देण्यात येईल. तुमचा जीडीपी खाली कोसळत आहे, तुमचे कर्ज वाढत आहे. त्यावर व्याज वाढत आहे. रुपया खाली पडत आहे. तरी पण भारताने आपली विदेश निती अमेरिकेपुढे पुर्णपणे सरंडर केली आहे.रेल्वे, डीआरडीओची चौकशी झाली काय नाही. मग लोक का म्हणतात निवडणुकीत पैसा अदानीचा आला पण गंगाधर हाच शक्तीमान आहे आणि शक्तीमानच गंगाधर आहे हे या प्रकरणातील सत्य आहे.
सोर्स: दिपक शर्मा, प्रा.अखिल स्वामी, प्रा.अरविंद चतुर्वेदी, उमाकांत लखेडा, ऍड. अशोक अरोडा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
Join NandedLive
Hello
Can we help you?