नांदेड(प्रतिनिधी)-मौजे तुपशेळगाव ता.देगलूर येथे एका 28 वर्षीय युवकाचा खून झाला आहे.
सविता राजेंद्र वाघमारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 5 फेबु्रवारी रोजी दुपारी 12.30 वाजेच्यासुमारास अरुण दत्ता वाघमारे यांच्या घरासमोरून राजेंद्र बापूराव वाघमारे (28) हे जात असतांना महेश बालाजी बोईनवार आणि शिवाजी निवृत्ती बोईनवार यांनी संगणमत करून भुखंड खरेदी केल्याच्या कारणावरून राजेंद्र वाघमारेला दगडाने ठेचून खून केला आहे. देगलूर पोलीसांनी हा प्रकार गुन्हा क्रमांक 23/2025 नुसार दाखल केला आहे. पोलीस निरिक्षक मुंडे अधिक तपास करीत आहेत.
Post Views: 172
Leave a Reply