नांदेड(प्रतिनिधी)-2 फेबु्रवारी रोजी पाटीदार भवन येथे मरण पावलेल्या युवकाला मारहाण झाल्यामुळे तो मरण पावला या आशयाच्या तक्रारीवरुन आता खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
दि.2 फेबु्रवारी सायंकाळी 7 वाजता पाटीदार भवन पटेल कॉलनी जवळ रुपेश दिगंबर धुताडे (20) रा.खोब्रागडेनगर नांदेड याचा मृतदेह सापडला होता. त्या दिवशी त्या संदर्भाने आकस्मात मृत्यूची नोंद झाली होती. त्यानंतर मयत रुपेश धुताडेचे वडील दिगंबर गणपतराव धुताडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 2 फेबु्रवारी रोजी तो त्याच्या मित्रांसोबत पाटीदार भवनसमोर उभा असतांना खोब्रागडेनगरमधील लक्ष्मण गायकवाड (40) हे तेथे आले आणि त्यांनी माझ्या मुलास कशाला घेवून आलास, गल्लीत दादागिरी करायला का म्हणून रुपेश धुताडेच्या गालावर थापड मारली. त्यामुळे रुपेश खाली पडला. त्यानंतर लक्ष्मण गायकवाडने उजव्या पायाने त्याच्या डोक्यात लाथांनी मारहाण केली आणि त्यामुळे तो मरण पावला आहे. या तक्रारीनुसार शिवाजीनगर पोलीसांनी दिगंबर गायकवाड विरुध्द भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1) नुसार गुन्हा क्रमांक 42/2025 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक माने यांच्याकडे देण्यात आला आहे.
2 फेबु्रवारी रोजी पाटीदार भवन समोर मरण पावलेल्या मुलाच्या मृत्यूप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल

Leave a Reply